Gokul Milk Kolhapur : गोकुळच्या दूध वाहतूक टेम्पोमधून व्हायची दुधाची चोरी, असा लागला छडा

Kolhapur Milk : दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील दूध चोरी होत असल्याचा प्रकार कौलगे (ता. कागल) येथील दूध उत्पादक व संस्था प्रतिनिधी यांनी काल (ता.३१) रात्री रंगेहाथ पकडली आहे.
Gokul Milk Kolhapur
Gokul Milk Kolhapuragrowon

Kolhapur Milk News : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकुळची ओळख आहे. गोकुळ दूध संघात कोल्हापूरसह कर्नाटक सीमाभागातूनही दूध पुरवठा होतो. दरम्यान गोकुळ दूध संघातील एका टेम्पोचा कागल तालुक्याच्या कौलगेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील दूध चोरी होत असल्याचा प्रकार कौलगे (ता. कागल) येथील दूध उत्पादक व संस्था प्रतिनिधी यांनी काल (ता.३१) रात्री रंगेहाथ पकडली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ दूध संघाचे कोल्हापूर जिल्ह्यात दूध संकलन करण्यासाठी टेम्पो फिरत असतात. दरम्यान टेम्पोमधील कौलगे (ता. कागल) येथील एका दूध संस्थेला दूध चोरी होत असल्याची शंका होती. यावरून दूध उत्पादक व संस्था प्रतिनिधी यांनी बुधवारी रात्री रंगेहाथ पकडली.

टेम्पो निर्जन माळरानात थांबवून त्यातील दूध एका कॅनमधून किटलीने काढले जात होते. दरम्यान टेम्पो चालक व क्लीनर मात्र पसार झाले आहे. या प्रकाराचा दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. कौलगे येथील दूध संस्थांच्या दुधाची प्रत सातत्याने कमी येत होती.

Gokul Milk Kolhapur
Shoumika Mahadik : 'शौमिका महाडिकांकडून दूध उत्पादकांची दिशाभूल'

यामुळे दूध संस्थेला याचा मोठा आर्थिक फटका संस्थेला बसत होता. उत्पादक प्रामाणिकपणे दूध पुरवठा करतात, तरीही असे का घडते, या विचाराने शंका येऊन टेम्पोवर पाळत ठेवली होती. त्यावेळी कौलगे येथील दोघांना खडकेवाडा येथील भैरी मंदिरानजीक टेम्पो (एमएच ०९ एल ५०३२) थांबून त्यातील कॅनमधून दूध काढले जात असल्याचे निदर्शनास आले.

त्यावेळी त्यांनी टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला; पण थांबला नाही. टेम्पो बेळंकी येथे गेल्यानंतर चालक व क्लिनर पसार झाले; मात्र ती किटली तशीच होती. हा प्रकार समजताच गोकुळ दूध संघाचे सहायक संकलन अधिकारी सी. एस. घाळी, सीनिअर सुपरवायझर एस. एम. सुळकुडे, सुपरवायझर आर. बी. लाडगावकर, आर. बी. घाटगे, आर. ए. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. टेम्पो चालकाचे नाव विनोद शिंदे (रा. कोडणी) असल्याची माहिती समोर आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com