Ethanol Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Production : तेल उत्पादक कंपन्यांनी नोंदवली ९७० कोटी लिटर इथेनॉलची मागणी

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदाच्या इथेनॉल वर्षासाठी (२०२४-२५) तेल कंपन्यांनी इथेनॉल उत्पादकांकडून ९७० कोटी लिटरची मागणी नोंदवली आहे. यंदाच्या हंगामासाठी ९१६ कोटी लिटरची गरज असताना गरजेपेक्षा जादा इथेनॉलची मागणी नोंदवली आहे. ही मागणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

९७० कोटींपैकी ३९१ कोटी लिटर इथेनॉलची मागणी उसावर आधारित इथेनॉलची आहे. धान्यापासून बनवलेल्या इथेनॉलची मागणी ५७९ कोटी लिटर आहे. तेल कंपन्यांनी ऊस व उपपदार्थांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलपेक्षा धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला अधिक पसंती दिली आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंधने आणल्याने इथेनॉल तयार करण्याचे प्रमाण घटले. एप्रिल २०२३ पर्यंत भारतात इथेनॉल मिश्रणाचा वेग अधिक होता. यानंतर वेग मंदावला. साखर उद्योगावर इथेनॉलसाठी मर्यादा घातली तेथूनच केंद्राच्या इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमावरही त्याचा परिणाम झाला.

अशा निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीचा वेग कमी आहे. मक्याचे उत्पादनही घटले तसेच अनुदानित तांदळावरही बंदी घातली यामुळे साखर उद्योगाव्यतिरिक्त इतर शेतीमालापासून तयार होणारे इथेनॉलही कमी उत्पादित झाले. केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमावर परिणाम होऊ नये यासाठी तेल कंपन्यांनी राखीव स्टॉकमधून इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये केले. यंदा केंद्राने इथेनॉलवरील सर्व निर्बंध दूर केल्याने निर्मिती चांगली होईल, अशी अपेक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर तेल कंपन्यांनी गरजेपेक्षा जादा मागणी नोंदवली आहे.

भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशाची क्षमता १६४८ कोटी लिटर आहे. २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १०१६ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana : बँक कर्मचाऱ्यांनी उपसले लाडकी बहीण योजनेच्या विरोधात संपाच हत्यार; १६ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा

Solar Agriculture Pump : सौर कृषिपंपासाठी नऊ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

Warna Doodh Sangh : दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांचा वारणा ब्रँड

Sugarcane Commissionarate : तक्रारींच्‍या निराकरणासाठी साखर आयुक्‍तालयात सोय

Livestock Management : मुक्तसंचार गोठा, जातिवंत पैदासीवर लक्ष द्या ः डॉ. घोरपडे

SCROLL FOR NEXT