Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Arrival : अकोल्यात नव्या तुरीची आजपासून आवक स्वीकारणार

नवीन तुरीची बाजारात मोठी आवक होत असल्याने येथील बाजार समितीत लिलाव तसेच मोजमाप प्रक्रियेला विलंब होत आहे.

Team Agrowon

Akola Tur Market News ः येथील बाजार समितीत तुरीचा लिलाव तसेच मोजमापाला विलंब होत असल्याने वारंवार आवक थांबवण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. आजपासून (ता. ९) फक्त सकाळी सहा ते दहा यावेळेत आलेल्या तुरीची आवक (Tur Arrival) स्वीकारली जाणार आहे.

नवीन तुरीची बाजारात (Tur Market) मोठी आवक होत असल्याने येथील बाजार समितीत लिलाव तसेच मोजमाप प्रक्रियेला विलंब होत आहे. यामुळे बाजाराच्या प्रांगणात तुरीची नवीन आवक ठेवायला जागा उपलब्ध राहलेली आहे.

परिणामी गेल्या काही दिवसांत तिसऱ्यांदा बाजारात तुरीची आवक स्वीकारणे बंद ठेवण्यात आले. गेले तीन दिवस तुरीची आवक घेतली गेलेली नाही.

आजपासून (ता.९) तूर स्वीकारण्याबाबत बाजार समितीने जाहीर केले आहे. सध्या तुरीचा दर सात हजारांच्या आत आलेला आहे.

सोमवारी बाजारा सरासरी ६९०० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर विक्री झाली. तुरीचा कमीत कमी दर ६ हजार, तर कमाल दर ७६२५ रुपये मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बाजारात तुरीचे वेगवेगळे वाण आल्याने दर्जात फरक असतो. त्यामुळे प्रत्येक लॉटचा लिलाव करताना वेळ लागतो. याचा सरासरी परिणाम हा लिलाव व नंतर मोजमापावर होत आहे.

दररोज दोन ते अडीच हजार क्विंटलची आवक होत आहे. यामुळे माल साचत आहे. प्रांगणात माल ठेवायला जागासुद्धा शिल्लक राहत नसल्याचा प्रकार घडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: दिवाळीत शेतकऱ्यांना मोठी भेट, हरियाणा सरकारने जाहीर केला देशातील सर्वाधिक ऊस दर

Soybean MSP: हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेला विलंब 

Indian Economy: भारतीय बाजारपेठेच्या शक्तीची झलक

Farmers Protest: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, आंदोलनाचा दिला इशारा

Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची खीळ काढा

SCROLL FOR NEXT