Soybean Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : लासलगावात नवे सोयाबीन आणि मका आवक सुरू

Maize Market : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हंगामातील नवीन सोयाबीन व मक्याची आवक सुरू झाली असल्याची माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

मुकूंद पिंगळे

Nashik News : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हंगामातील नवीन सोयाबीन व मक्याची आवक सुरू झाली असल्याची माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली. मुहूर्तावर पाटोदा (ता. येवला) येथील शेतकरी सतीश ठोंबरे यांचा सोयाबीन ५,००० प्रतिक्विंटल या दराने श्लोक मार्केटिंग इंडियाने खरेदी केला. रायपूर येथील शेतकरी नामदेव बाबूराव कोल्हे यांचा मका २७११ रुपये प्रतिक्विंटल दराने भागीनाथ गांगुर्डे यांनी खरेदी केला.

जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, सिन्नर, सटाणा, देवळा, कळवण व मालेगावसह नगर जिल्ह्यातील कोपरगाव व राहुरी आदी तालुक्यांतील गावांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन व मक्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने मालविक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीने सर्व प्रकारच्या भुसार व तेलबिया शेतीमालाचे नियमन करून लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारावर तसेच मानोरी खुर्द तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू केलेले आहे.

शुक्रवारी (ता. १३) बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर हंगामातील नवीन सोयाबीन व मका या शेतीमालाची आवक सुरू झाली आहे. प्रारंभी बाजार समितीचे माजी संचालक तथा जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा, समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे व उपस्थित व्यापारी वर्गाच्या हस्ते सोयाबीन व मक्याचे विधिवत पूजन करण्यात आले.

प्रारंभ प्रसंगी श्री. वाढवणे यांनी शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावा यासाठी खरेदीदार/निर्यातदार व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्यावर बाजार समितीचा भर राहणार आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल परस्पर शिवार खरेदीद्वारे विक्री न करता योग्य प्रतवारी करून बाजार समितीच्या अधिकृत बाजार आवारातच विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर शेतकरी बांधवांना लगेचच रोख पेमेंट देण्यात येणार आहे.

जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा, भुसार व तेलबिया व्यापारी चंद्रप्रकाश डागा, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सागर थोरात, दीपककुमार ब्रम्हेचा, मनोज थोरात, श्रीनिवास मुंदडा, धोंडीराम जगताप, सुरेश लुटे, रवींद्र वाघ, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुरेश विखे, सहायक सचिव सुशील वाढवणे, पंकज होळकर, हिरालाल सोनारे, नंदकुमार गोधडे, प्रभारी स्वप्निल पवार, नामदेव बर्डे, गणेश आहेर, सचिन वाघ, सचिन वैरागी, विनोद फलके, दत्तात्रय देवढे, यशवंत इप्पर, दीपक जेऊघाले, अमोल गायकर, सागर सोनवणे यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT