Team Agrowon
देशात इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा अधिक आहेत. तसेच मक्याची आयातही वाढत आहे.
चालू वर्षात मक्याची आयात निर्यातीपेक्षा जास्त झाली. तसेच भाव वाढल्याने पोल्ट्री उद्योगाने आयात खुली करण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सध्या हे प्रमाण १३ टक्के आहे. त्यासाठी देशात इथेनॉल निर्मिती वाढविण्याला सरकार प्रोत्साहन देत आहे.
परंतु गेल्यावर्षी देशात उसाचे उत्पादन घटले. परिणामी साखरेचे उत्पादनही घटले. भारत साखरेचा मोठा ग्राहक आहे. देशांतर्गत गरज भागविण्यासाठी सरकारने थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली.
तर धान्यापासून इथेनॉल निर्मितीसाठी धान्य उपलब्ध नव्हते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशात धान्याचेही उत्पादन कमी होऊन भाव वाढले. त्यामुळे इथेनॉलसाठी मक्याचा पर्याय उरला.
मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारने जानेवारीत मक्यापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे इथेनॉल उद्योगाकडून मक्याची मागणी वाढली.
देशात इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढला. मात्र देशातील मका उत्पादन घटले आहे. परिणामी देशात मक्याची आयात वाढली आहे. गेल्या १० वर्षांत पहिल्यांच मका आयात निर्यातीपेक्षा जास्त झाली.
भारत दरवर्षी २० लाख ते ४० लाख टनांच्या दरम्यान मक्याची निर्यात करत असतो. परंतु यंदा मक्याची निर्यात ४ लाख ५० हजार टनांच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे. तर आयात १ लाख टनांवर पोहोचेल.
Karvi Flower : जनावरांच्या लाळखुरकत आजारावर प्रभावी आहेत कारवी फुलं, दाजीपूर अभयारण्यात आला बहर