Onion Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kharif Onion : नवीन खरीप कांद्याची आवक वाढली

Onion Market : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून राज्यात उन्हाळ कांदा आवक संपली तर नव्या खरीप लाल कांदा आवकेत सुधारणा झाली आहे. देशातील बाजारपेठेतील मागणी व निर्यातीमुळे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुकुंद पिंगळे

Nashik News : राज्यभरात प्रामुख्याने नाशिक, नगर, सोलापूर या जिल्ह्यांत नवीन खरीप कांद्याची आवक प्रामुख्याने होत असते. मात्र यंदा मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे कांद्याची आवक कमी होती. आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून राज्यात उन्हाळ कांदा आवक संपली तर नव्या खरीप लाल कांदा आवकेत सुधारणा झाली आहे. देशातील बाजारपेठेतील मागणी व निर्यातीमुळे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात दसऱ्याच्या मुहूर्ताला मुंगसे, उमराणे, चांदवड या बाजार आवारांतून कांद्याची आवक सुरू झाली. मात्र दर वर्षीच्या तुलनेत ही आवक हंगामात कमी होती. आता राज्यातील प्रमुख लासलगाव, घोडेगाव, पिंपळगाव बसवंत, सोलापूर अशा बाजारांमध्ये आवकेत वाढ दिसून येत आहे.

ऑक्टोबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात नवीन खरीप कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत दसऱ्यानंतर नवीन लाल कांद्याची आवक सुरू होत असते. मात्र यंदाच्या हंगामात ती कमी झाल्याचे दिसून आले. राज्यात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन खरीप पोळ कांद्याची आवक ११ ऑक्टोबर रोजी सुरू झाली होती.

त्या वेळी आवक ही अवघी ९६ क्विंटल होती. तर सरासरी दर प्रतिक्विंटल ३००० रुपये होता. आता आवक दर वर्षीच्या तुलनेत मुख्य हंगामात पूर्वपदावर आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आवकेत हळूहळू टप्प्याटप्प्याने सुधारणा झाली आहे. लासलगाव बाजार समितीत आवक १५ हजार क्विंटलच्या आत होती. डिसेंबर महिन्यापासून ही आवक वाढत गेली. तरीही प्रतिक्विंटल दर ३५०० ते ३७०० रुपये दरम्यान दर स्थिर आहेत. हीच परिस्थिती राज्यातील बाजार समित्यांमध्ये आहे.

देशातील इतर कांदा पट्ट्यात आवक कमीच
गुजरात राज्यातील महुवा, भावनगर परिसरांत आवक वाढत आहे. तर गोंडल परिसरात घटल्याचे दिसून येत आहे. तर दक्षिण भारतात करणुल, बंगळूर परिसरांतही आवक कमी होत आहे. राज्यासह नाशिक परिसरात सध्या आवक वाढत असून प्रतवारीत सुधारणा दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात खरीप कांद्याची आवक वाढली तरी मागणीमुळे सध्या बाजारात दर स्थिर आहे. पुढील दोन आठवडे ही स्थिती राहील असे कांदा व्यापारी व निर्यातदार मनोज जैन यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख बाजारातील आवक व दर स्थिती (ता. ९)
बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी

लासलगाव...२९४३५...१२००...५१००..३७००
विंचूर (लासलगाव)...९६६०...२०००...४५००...३८००
सोलापूर...३२७१४...३५००...७०००...३४००
पुणे...११६८३....२५००...७२००...४८५०
घोडेगाव (नेवासा)...२३५२०...१०००...५५००...४५००
पिंपळगाव बसवंत...१४५७९...१६००...४८००...३८५०
येवला...१०८७८...५००...४०८५...३२५०
मुंगसे (मालेगाव)...११०००...८५०...३९००...३५००
कळवण...१३२५...२०००...४१००...३६००
चांदवड...८२००...१०००...४४११...३६००
मनमाड...३५००...६००...४१७५...३४००
वणी (दिंडोरी)...२०३०...२९२०...४४६०..३८००
वांबोरी (राहुरी)...९१०१...५००...५७००...४०००
संगमनेर...९४९५...५००...५६००...३५५०
लासूर स्टेशन (छ. संभाजीनगर)...७१००..८५०...४८५०...३६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT