Vijay Jawandhiya Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Policy : कापूस उत्पादकांसाठीच्या धोरणात बदलाची गरज

सध्या देशातून कापूस आणि सोयाबीन ढेप (डिओसी) ची निर्यात ठप्प आहे. जागतिक बाजारातील मंदी हे त्यामागील कारण ठरले आहे.

Team Agrowon

नागपूर ः ‘‘अमेरिकेत कापसाचे दर (Cotton Rate) गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहेत. मात्र त्यानंतरही त्या देशात शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) का नाहीत? असा प्रश्‍न करीत केंद्र सरकारने कापूस उत्पादकांसाठीच्या आपल्या धोरणांचा (Policy For Cotton Farmer) पुनर्विचार करण्याची गरज आहे,’’ असे परखड मत शेतीप्रश्‍नांचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया (Vijay Jawandhiya) यांनी व्यक्‍त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भाने त्यांनी पत्र लिहिले आहे. पत्रानुसार, सध्या देशातून कापूस आणि सोयाबीन ढेप (डिओसी) ची निर्यात ठप्प आहे.

जागतिक बाजारातील मंदी हे त्यामागील कारण ठरले आहे. त्यासोबतच आज कापसाला मिळत असलेला दर हा १९९४-९५ या वर्षातील दरापेक्षाही कमी आहेत.

अमेरिकन कापूस बाजारात १९९५ मध्ये एक पाऊंड रुईचा दर एक डॉलर दहा सेंट होता. आजच्या घडीला हा दर अवघा १ डॉलर आहे. त्यावेळी भारतीय कापसाला २५०० ते २७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळत होता.

महत्त्वाची बाब म्हणजे त्यावर्षी कापसाचा हमीभाव अवघा १२०० रुपये इतका होता. मात्र डॉलरच विनिमय दर अवघा ३२ रुपये इतका होता. आज भारतीय कापूस उत्पादकांना ८००० ते ८५०० रुपये क्‍विंटल इतका दर मिळत आहे.

भारतीय डॉलरचा विनिमय दर ८२ रुपये झाला आहे. रुपयाचे होणारे अवमूल्यन हेच दरवाढीमागील कारण ठरले आहे. कारण भारत सरकारने कापसाला ६००० रुपये क्‍विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे.

एकंदरीत परिस्थितीचा विचार करता भारतीय कापूस उत्पादकांना चांगला परतावा मिळावा याकरिता कापूस गाठींच्या निर्यातीची गरज आहे.

‘फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन या पाच ‘एफ’चा समावेश आहे. कापसाच्या निर्यातीचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळावा, असे यात अपेक्षित आहे. मात्र आज कापसाचे भाव कमी झाले असून निर्यातही ठप्प आहे.

मात्र त्याचवेळी कापडाचे भाव मात्र कमी झाले नाहीत. एक लाख रुपये खंडी असा दर असलेल्या रुईचे व्यवहार ६२००० रुपयांनी होत आहेत. मग हा नफा कुठे जात आहे, असा प्रश्‍न जावंधिया यांनी व्यक्‍त केली.

साखरेप्रमाणेच कापूस उत्पादकांसाठी धोरण ठरवीत त्याची अंमलबजावणी आणि कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. निर्यात न झाल्यास देशात कापसाच्या गाठींची उपलब्धता अधिक होत त्याचा वापर कापसाचे भाव पाडण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी भीती आहे.

- विजय जावंधिया, शेती प्रश्‍नांचे अभ्यासक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Onion Farming: कांदा पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरजेनुसार व्यवस्थापन फायदेशीर

Gold Silver Price Today: सोने- चांदी दरात घसरण, आजचा प्रतितोळ्याचा दर काय?

Farmers Crisis: मळणीला आला वेग; अतिवृष्टीने घटला तुरीचा उतारा

Bio Fertilizer: अजैविक ताणावर वसंत ऊर्जा फायदेशीर

SCROLL FOR NEXT