Fardad Cotton Crop : जळगावात फरदड कापूस पीक परवडेना

डिसेंबरमध्येच फरदड कापूस पिकाबाबत अनेकांनी व्यवस्थापन सुरू केले. कारण मका पिकात अमेरिकन लष्करी अळी येते.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः कृषी विभागाची (Agriculture Department) जनजागृती मोहीम अपुरी पडत असल्याने जिल्ह्यात फरदड कापूस पीक (Fardad Cotton Crop) अनेक शेतकरी घेत आहेत. परंतु यंदा कमी दर (Cotton Rate) व वाढलेली मजुरी यामुळे फरदड (खोडवा) कापूस पीक परवडत नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात डिसेंबरमध्येच फरदड कापूस पिकाबाबत अनेकांनी व्यवस्थापन (Cotton Management) सुरू केले. कारण मका पिकात अमेरिकन लष्करी (Army Worm In Maize Crop) अळी येते.

तसेच गुलाबी बोंड अळीबाबत कृषी विभागही शेतकऱ्यांत जनजागृती करण्यासंबंधी अपुरा पडला. यातच इतर पिके परवडत नाही व त्यात हमी नसल्याने शेतकऱ्यांनी फरदड कापूस पिकाला पसंती दिली.

पिकाला खते, फवारणी घेतली. त्यासाठी एकरी दोन ते अडीच हजार रुपये खर्च आणखी वाढला. परंतु पिकात गुलाबी बोंड अळी व थंड वातावरणाने बोंडे उमललीच नाहीत.

त्यामुळे पीक वाया गेल्याची स्थिती आहे. यातच कापसाला दर कमी आहे. कापूस वेचणी महागली आहे.

२०० रुपये रोज याप्रमाणे मजुरी देऊन फक्त तीन ते चार किलो कापूस शेतकऱ्याच्या घरात येतो. यामुळे पिकात आणखी फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

बोंडांचा दर्जा हवा तसा नाही. तसेच कापूस खरेदीबाबत समाधानकारक स्थिती नाही. कापसाला हवा तसा दर नाही. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका यंदा बसत आहे.

मका व इतर पिकांचे नियोजनही वाढती निविष्ठा दर व अमेरिकन लष्करी अळीमुळे मागे ठेवावे लागले. कारण त्यासाठी आणखी खर्च करूनही नफा राहण्याचे संकेत नव्हते.

Cotton
Cotton Market : कापूस निर्यातवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार का?

खानदेशात सुमारे पाच ते सहा लाख हेक्टरवर खोडवा किंवा फरदड कापूस पीक आहे. काही शेतकऱ्यांनी गिरणा, अनेर, पांझरा व इतर प्रकल्पांच्या आवर्तनावर फरदड कापूस पिकाला पाणी दिले आहे. ही मेहनत, खर्च वाया गेल्याचे सध्या दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com