Chana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP Chana Procurement : हमीभावाने हरभरा विक्रीसाठी २८ केंद्रांवर नोंदणी सुरू

Chana Market : यंदा हमीभावाने हरभरा खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून ३८०.९६ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे.

Team Agrowon

Parbhani News : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत केंद्रीय नोडल एजन्सी नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) आणि एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) यांच्यावतीने रब्बी हंगाम २०२४-२५ मधील हरभरा हमीभावाने (प्रतिक्विंटल ५६५० रुपये) विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील १५ आणि हिंगोली जिल्ह्यातील १३ मिळून एकूण २८ खरेदी केंद्रांवर ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरु झाली आहे.

त्यासाठी २५ एप्रिल अंतिम मुदत आहे. हरभरा खरेदीचा कालावधी १ एप्रिल ते २९ जून २०२५ पर्यंत आहे. या दोन जिल्ह्यात ७५१.३२ टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

यंदा हमीभावाने हरभरा खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून ३८०.९६ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १२.५० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे.

असून ३७०.३६ टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीकरिता सोबत हरभऱ्याचा ऑनलाइन पिकपेरा नोंद असलेला २०२४-२५ मधील ७-१२ उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणावी.

बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा. जनधन बँक खाते क्रमांक किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये. संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.

परभणी -हिंगोली जिल्हे हरभरा हमीभाव खरेदी केंद्र ठिकाण,संपर्क

केंद्र ठिकाण केंद्राचे नाव केंद्र चालक संपर्क क्रमांक

पेडगाव किसानजीवन अॅग्रो.एफपीसी, पेडगाव नारायण देशमुख ७०२०८४४९३२

बोरी तुळजा भवानी कृ.वि.सह.संस्था,बोरी संतोष शिंदे ७६२०१९४४२६

जिंतूर जिनिंग प्रेसिंग सहकारी सो.जिंतूर एस.डी.पारवे ७५८८४३१३७७

भोगाव देवी भोगाव देवी फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि सोपान पुंजारे ९०२१२५२२३५

सेलू तुळजा भवानी कृ.वि.सह.संस्था,बोरी विठ्ठल शिंदे ९८६०९८६८५४

मानवत तालुका सह.ख.वि.संघ,मानवत माणिक भिसे ९८६०६५४१५९

रुढीपाटी सिद्धी मानवत अॅग्रो एफपीसी विजय मुळे ७६२०२५३८२०

पाथरी स्वस्तिक सु.बेरोजगार सह.संस्था,पाथरी अनंत गोलाईत ९९६०५७००४२

देवनांद्रा वाल्मिकेश्वर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी गणेश नखाते ८९५६७१६८६९

सोनपेठ स्वप्नभूमी सु.बेरोजगार सह.संस्था,सोनपेठ श्रीनिवास राठोड ९०९६६९९६९७

पालम सिरस्कर फार्मर प्रोड्युसर कंपनी नागेश सिरस्कर ९८८११९४६ ४६

चाटोरी बी.आर.ढगे पाटील,अॅग्रो प्रोड्युसर कंपनी दत्ता ढगे ९४०५५४१०१०

पूर्णा तालुका सह.ख.वि.संघ, पूर्णा संदीप घाटोळ ९३५९३३३४१३

ताडकळस सुरध्याक्ष फार्मर प्रोड्यूसर कंपनी अनंता बोखारे ९५४५०३७१३१

एरंडेश्वर देवकृपा एरंडेश्‍वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि दिलीप काळे ९४०५११८११

हिंगोली प्रगती सेवा सह.संस्था, हिंगोली नारायण भिसे ९८५०७९२७८४

कनेरगाव श्रीसंत नामदेव स.सह.संस्था,चोरजवळा अमोल काकडे ८००७३८६१४३

फाळेगाव श्रीफाळेश्वर महाराज एफपीसी मारोती वैद्य ९९७५०५५७३१

कळमनुरी कयाधू शेतकरी उ.कंपनी, तोंडापूर महेंद्र माने ९६८९२२९३९३

वारंगाफाटा कयाधू शेतकरी उ.कंपनी, तोंडापूर मारोती कदम ९७३६४४९३९३

शिवनीखुर्द गोदावरी व्हॅली एफपीसी,लि कैलास ढोकणे ७४४७७५८३१२

वसमत तालुका सह.ख.वि.संघ, वसमत सागर इंगोले ८३९०९९५२९४

आडगाव सतरंग ग्रेन फार्मर प्रोड्यूसर कंपनी कल्याण गायकवाड ९५११६८६८८२

जवळा बाजार तालुका सह.ख.वि.संघ, औंढानागनाथ कृष्णा हरणे ९१७५५८६७५८

येळेगाव हजरत नासरगंज बाबा से.सह.संस्था, हिंगोली शेख गफार ९८८१५०१०४०

सेनगाव श्रीसंत भगवानबाबा स.संस्था, कोथळज नीलेश पाटील ९८८११६२२२२

साखरा विजयालक्ष्मी बे.सह.संस्था, कोळसा उमाशंकर माळोदे ९४०३६५१७४३

नागासिनगी मान्यता फार्मर प्रोड्यूसर कंपनी संदीप काकडे ९८२३२५२७०७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT