Chana MSP Procurement: हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी, खरेदीला अल्प प्रतिसाद

Chana Market: हरभरा हमीभावाने खरेदीसाठी शासनाने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत नोंदणी सुरू केली आहे. मात्र बाजारात जास्त दर मिळत असल्याने आणि सरकारी खरेदी व्यवस्थेतील अडचणींमुळे शेतकरी थेट बाजारपेठेचा पर्याय निवडत आहेत.
Chana
ChanaAgrowon
Published on
Updated on

Buldana News: केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेड तसेच ‘एनसीसीएफ’च्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) वतीने २७ मार्चपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आठवडाभरात हरभरा नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. गुरुवारपर्यंत (ता. तीन) अवघी ६१०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर २२८ क्विंटल हरभरा खरेदी झाली.

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शासनाने नावनोंदणी सुरू करीत खरेदीसाठी केंद्रही सुरू केले. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह २५ एप्रिलपर्यंत संबंधित खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासन वारंवार करीत आहे. मात्र शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळेनासा झालेला आहे.

Chana
Chana Import Duty: हरभरा आयातीवर १०% शुल्क; सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय!

याबाबत अंकुश देशमुख (सोनाळा) म्हणाले, की बाजारपेठेत हरभरा चांगल्या भावात जात आहे. ५६०० ते ५८०० पर्यंत दर मिळतो आहे. डॉ. गजानन गिऱ्हे (देऊळगावमाळी) म्हणाले, की एकतर आता बाजारभाव हमीभावाजवळ मिळतो आहे. दुसरे म्हणजे या यंत्रणेत मापात पाप होते. शंभर ते दोनशे रुपये खर्च लागतो. वेळेवर चुकारे मिळत नाहीत. चाळणी, मालात होणारी अफरातफर, माल मोजण्यात होणारी दिरंगाई, चुकीच्या खात्यात पेमेंट जाणे, कमी पेमेंट येणे अशी अनेकविध कारणे आहेत.

Chana
Chana Procurement: हमीभावाने हरभरा खरेदी नोंदणीला आजपासून सुरुवात

ही खरेदी व्यवस्था भ्रष्टाचार करण्याचे केंद्र बनते आहे. निंबाजी लखाडे (खुदनापूर) म्हणाले, की नाफेड केंद्र म्हणजे सुविधा कमी, त्रास अधिक. पैसे वेळेवर मिळत नाहीत. हमाली दुप्पट आकारली जाते. शेवटी मालाची हेळसांड, नुकसान आणि चोरीच्या घटना याला शेतकरी कंटाळला असून मार्केटमध्ये १००, २०० रुपये कमी आले तरी चालेल संध्याकाळी पैसे नगदी मिळतात. सोयाबीन नाफेड केंद्र सुरू झाले तेव्हापासून हा ट्रेंड चालू आहे.

रमेश निकष (जानेफळ) म्हणाले, की बहुतेक सर्व हरभरा विकला गेला. दुसरे म्हणजे २०० रुपयांचा फरक आहे. नाफेडला हरभरा दिला तर एक क्विंटलमध्ये चारशे रुपये लो ग्रेड काढतात. लो ग्रेड, हमाली, भाडे, वेळ याचा विचार आणि हिशोब केला तर हरभरा नाफेडला देणे आजच्या भावात परवडत नाही.

हमीभाव खरेदीची स्थिती

नाफेडचे सुरू केंद्र ४५४

नाव नोंदणी ५१३५

खरेदी १५३ क्विंटल

‘एनसीसीएफ’चे केंद्र ५०

नोंदणी ९७३

खरेदी ७५ क्विंटल

एकूण नोंदणी ६१०८

हरभरा खरेदी २२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com