Ethanol Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Production : इथेनॉलकडे साखर वळविण्यास परवानगी देण्याच्या हालचाली

Ethanol Production Ban : ऊस हंगामाच्या अंतिम टप्प्यात इथेनॉलसाठी साखर वळविण्यास केंद्र परवानगी देण्याची शक्यता आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ऊस हंगामाच्या अंतिम टप्प्यात इथेनॉलसाठी साखर वळविण्यास केंद्र परवानगी देण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र स्तरावरून सकारात्मक हालचाली सुरू असल्या तरी हा निर्णय कधी होईल, याबाबत अस्पष्टता आहे. साधारणतः आठ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यासाठी परवानगी मिळू शकते.

केंद्राने याबाबत सकारात्मकता दाखवली असली तरी अजूनही सध्याचे उत्पादन व भविष्यातील विचार करूनच ही परवानगी देण्यात येईल, असे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. देशात सुरवातीचे दोन महिने वगळता जानेवारीपासून महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये साखरेचे अतिरिक्त उत्पादन सुरू झाले. हंगामाच्या पूर्वी या दोन राज्यात साखर उत्पादन कमी होईल, असा अंदाज साखर उद्योगातील सर्वच संस्थांनी व्यक्त केला होता.

या पार्श्वभूमीवर केंद्रांनी ही सावध भूमिका घेताना इथेनॉलपासून साखर निर्मितीवर प्रतिबंध लावले होते. जसा हंगाम पुढे जाईल तशी साखर निर्मिती वाढत गेली. यामुळे साखरेचा अपेक्षित तुटवडा जाणवला नाही. पण सरकारने निर्बंध कायम ठेवल्याने नवे इथेनॉल प्रकल्प मात्र अडचणीत आले.

ही स्थिती पाहता साखर उद्योगातील सर्वच संस्थांनी सरकारला साखर उत्पादन वाढत असल्याची जाणीव करून दिली. गेल्या दोन महिन्यांपासून तर प्रत्येक पंधरवड्याला अनेक संस्था केंद्राला इथेनॉल निर्मितीसाठी साखरेला परवानगी द्या अशी नव्याने मागणी करीत आहेत. गेल्या पंधरवड्यातील आकडेही साखर उत्पादन वाढ दाखवणारे आहेत.

साखर उद्योगाच्या सातत्यपूर्ण वाढीमुळे केंद्र ही याबाबतीत सकारात्मक विचार करत असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. मात्र जोपर्यंत साखरेचे उत्पादन खरेच वाढत आहे का याची खात्री केंद्राला पटत नाही, तोपर्यंत केंद्रस्तरावरून कोणत्याही हालचाली होणार नाहीत, असेही सांगण्यात आले.

पंधरा दिवसांत परवानगी देण्याची मागणी

सध्या उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्र व कर्नाटकातील हंगाम जवळजवळ अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे येत्या पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत केंद्राने इथेनॉलसाठी साखर वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे. केंद्राने हंगाम सुरू झाल्यानंतर १७ लाख टन साखर इथेनॉलसाठी वळविण्यास परवानगी दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

Dairy Farming: पशुपालनात दैनंदिन व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT