Ethanol Production : इथेनॉलसाठी जादा साखरेस परवानगीबाबत ‘वेट अँड वॉच’

Sugar For Ethanol : गेल्या पंधरा दिवसांमध्ये देश पातळीवरील विविध संस्थांनी केंद्राकडे इथेनॉलकडे साखर वळवण्यास आणखी परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे.
Sugar
SugarAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : साखर उद्योगातील विविध संस्थांनी यंदा साखर उत्पादन अपेक्षे इतके घटणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतरही केंद्र शासन अजूनही इथेनॉल निर्मिती वाढविण्यासाठी साखरेस आणखी परवानगी देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे चित्र आहे. सध्या या हंगामातील १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास केंद्राची परवानगी आहे.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये देश पातळीवरील विविध संस्थांनी केंद्राकडे इथेनॉलकडे साखर वळवण्यास आणखी परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. जरी उत्पादनाचे अंदाज साखर उद्योगातील संस्थानी दिले असले तरी केंद्रीय सूत्रांनी अद्यापही त्यावर विचार केलेला नाही. जोपर्यंत केंद्राची पुरेशा साखर उत्पादनाबाबत खात्री होत नाही तोपर्यंत वाढीव परवानगी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

Sugar
Sugar For Ethanol : इथेनॉलकडे ४० लाख टन साखर वळविण्यास वाव

येणाऱ्या एक, दोन महिन्यांमध्ये निवडणुकांचा कालावधी असल्याने केंद्र शासन खुल्या बाजारात साखरेचे दर वाढविण्यासाठी पूरक गोष्टींना परवानगी देणे अशक्य असल्याचे अन्न सार्वजनिक पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हंगाम सुरू होण्यापूर्वी जागतिक बाजारात तसेच देशांमध्येही साखरेची चणचण निर्माण होण्याची शक्यता विविध संस्थांनी व्यक्त केली. देशांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साखर उत्पादनाचे आकडे दर्शविण्यात आले. यामुळे साखरेचे बाजारातील दर मोठ्या प्रमाणात वाढतील व त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकाला बसेल या हेतूने केंद्राने ऑगस्टपासूनच साखर उद्योगाकडे करडी नजर केली.

साखरेच्या विक्री कोट्यावर निर्बंध आणून त्यावर सातत्याने नजर ठेवली. मागणीपेक्षा काहीशी जादा साखर उपलब्ध करण्याकडे केंद्राचा कल राहिला. यामुळे साखरेचे दर ज्या प्रमाणात वाढायला हवे तितके वाढले नाहीत.

डिसेंबरनंतर मात्र महाराष्ट्र व कर्नाटकातील काही भागांत अंदाजापेक्षा जादा साखर उत्पादन होत असल्याचे साखर कारखान्यांना निदर्शनास आले. कारखान्याच्या संघटनांनी ही बाब केंद्रापुढे आणण्याचा प्रयत्न केला. केंद्राने मोठ्या प्रमाणात साखर घट होईल या भीतीपोटी इथेनॉलसाठी साखर वापरण्यावर ही घट आणली होती.

Sugar
Ethanol Production : इथेनॉलसाठी १० ते १२ लाख टन साखर वळविण्यास परवानगी द्यावी

निर्यातीचा तर विचारही केला नव्हता. पण गेल्या एक-दीड महिन्यात साखर उत्पादन वाढत असल्याचे लक्षात येताच देश पातळीवरील संस्थांनी इथेनॉल निर्मितीसाठी जादा साखर वळवण्याला परवानगी देण्याची आग्रही मागणी केली आहे. उत्पादन वाढत असल्याने पुढील हंगामासाठी पुरेसी साखर शिल्लक राहील, असा दावा या संघटनांनी केला आहे.

...तर नुकसानीच्या छायेतील प्रकल्पांना दिलासा

सरकारने जर अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळविण्यास परवानगी दिल्यास नुकसानीच्या छायेत असलेल्या प्रकल्पांना दिलासा मिळेल, असे कारखानदारांच्या संघटनांनी केंद्राला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

'संघटनांनी मागणी केली असली तरी अजूनही केंद्राकडून या बाबत सकारात्मक हालचाली होत नसल्याचे चित्र आहे. कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत साखरेचा पुरेसा साठा होईल अशी केंद्राला खात्री होत नाही तोपर्यंत केंद्र कोणताही नवीन निर्णय घेणार नाही, असे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com