Soybean Seed Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market News : सोयाबीन हमीभाव केंद्रांच्या हालचाली कासवगतीने

Soybean Rate : सोयाबीन खरेदी केंद्रांचा मुहूर्त ठरलेला नाही. परिणामी नोंदणी अजूनही सुरू झालेली नाही. सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्रांचा मुहूर्त ठरलेला नाही. परिणामी नोंदणी अजूनही सुरू झालेली नाही. सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू होण्याची शक्यता आहे.

सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. जिल्ह्यात दरवर्षी सोळा केंद्रांवर नोंदणी व खरेदी व्हायची. गेल्यावर्षी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे आठ तर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनकडे आठ केंद्रे होती.

नाफेडने केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र, अजूनही शासनाकडून ते सुरू करण्यासंदर्भात हालचाली झालेल्या नाहीत. सध्या सोयाबीनचे दर काहीसे वाढले आहेत. यापुढे बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हमीभाव केंद्रे सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत केंद्रांचा प्रस्ताव पाठविला आहे. ‘नाफेड’कडे आठ केंद्रे निश्‍चित केलेली असली तरी त्यापैकी प्रत्यक्ष किती सुरू होतील, हे गुलदस्त्यात आहे.

२२ वर्षानंतर बोरीत खरेदी

बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जवळपास बारा वर्षांपासून शेतीमाल खरेदी बंद होती. दहा वर्ष बाजार समितीवर प्रशासक होते. त्यामुळे खरेदी सुरू झाली नाही. यंदा निवडणुकीनंतर बाजार समितीत खरेदीला सुरवात झाली आहे. कीर्तनकार बबन महाराज देवकोडोलीकर यांच्या हस्ते खरेदीस प्रारंभ झाला. या वेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुइखेडकर, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, सहायक निबंधक बी. जी. जाधव उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT