Micro Food Processing Scheme Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric : हळद, बेदाण्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग करा ः गोविंद हांडे

भौगोलिक मानांकन मिळालेल्या हळद व बेदाणा या उत्पादनाचा फायदा उद्योजक, निर्यातदारांनी घेऊन याचे मार्केटिंग व ब्रँडिंग करावे

Team Agrowon

सांगली ः भौगोलिक मानांकन मिळालेल्या हळद व बेदाणा या उत्पादनाचा फायदा उद्योजक, निर्यातदारांनी घेऊन याचे मार्केटिंग (Market) व ब्रँडिंग करावे, असे आवाहन कृषी आयुक्तालय, पुणे येथील तंत्र सल्लागार गोविंद हांडे यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या खरेदीदार-विक्रेता संमेलनात ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, अन्न व प्रशासन विभागाचे उपायुक्त सुकुमार चौगुले, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल ढाकणे, सुरेश पाटील, उद्योजक, खरेदीदार व विक्रेते उपस्थित होते.

श्री. हांडे म्हणाले, की देशांतर्गत व परदेशांत प्राधान्याने अंशमुक्त, विषमुक्त व प्रक्रिया केलेल्या मालाची मागणी आहे. अंशमुक्त शेतीमाल तयार करणे व त्यावरच प्रक्रिया करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेत तरुण उद्योजकांनी ‘अपेडा’ प्रणालीवर ऑनलाइन नोंदणी करावी. उपलब्ध ऑनलाइन बाजारपेठेचा उपयोग करावा. त्यासाठी योग्य उत्कृष्ट पॅकिंग, लेबलिंग, ब्रँडिंग असणे आवश्यक आहे.

चौगुले, प्रकाश सूर्यवंशी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. अमोल ढाकणे, अशोक बाफना, रोहन झंवर, वसीम फकीर, आदित्य शहा, पूनम साटम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रियांका भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण बनसोडे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. प्रकाश नागरगोजे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

NASAKA Sugar Factory : थकीत देण्यांवरून नासाका प्रशासनाच्या रडारवर

Rain Update: कडाक्याच्या उन्हानंतर पहाटेच्या पावसाने दिलासा

Gazette Mismatch : गॅझेटमधील नावे वेगळी, दगड वेगळ्याच ठिकाणी

SCROLL FOR NEXT