Vegetables Agrowon
मार्केट ट्रेंड

Ahmednagar Vegetable Rate : नगरला बटाटे, कोबी, टोमॅटोसह भाजीपाल्याची आवक वाढली

Vegetable Market Rate : नगर येथील बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटोची १६५ क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते सहा हजार रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Ahmednagar News : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात बटाटे, टोमॅटो, काकडी, कोबीसह अन्य भाजीपाल्याची आवक काहीशी वाढली आहे. दरात मात्र काही प्रमाणात चढउतार सुरु आहे. फळांची आवक जेमतेम असून दरही स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर येथील बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटोची १६५ क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते सहा हजार रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. पंधरा दिवसांपूर्वी हा दर ९ हजाराच्या पुढे होता. वांगीची ३८ क्विंटलपर्यंत आवक होऊन अडीच हजार ते चार हजार, फ्वावरची ७० क्विंटलपर्यंत आवक होऊन अडीच हजार ते चार हजार, कोबीची ११० क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते १८००, काकडीची १२० क्विंटलपर्यंत आवक होऊन १२०० ते २ हजार, गवारची १० क्विंटलपर्यंत आवक होऊन ४ हजार ते ८ हजार, घोसाळ्याची ७ क्विंटलपर्यंत आवक होऊन अडीच ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

दोडक्याची १२ क्विंटलपर्यंत आवक होऊन तीन हजार ते साडेचार हजार रुपये, कारल्याची १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन साडेतीन ते साडेचार हजार रुपये, भेंडीची ५० क्विंटलपर्यंत आवक होऊन दोन हजार ते साडे तीन हजार, वाल शेंगाची ४० क्विंटलपर्यंत आवक होऊन पाच हजार ते सहा हजार, घेवड्याची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन चार हजार ते पाच हजार, बटाट्याची दर दिवसाला ७५० क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते १७००, हिरव्या मिरचीची ६५ क्विंटलपर्यंत आवक होऊन दोन हजार ते साडेतीन हजार, शेवग्याची १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन अडीच हजार ते चार हजार रुपयांचा दर मिळाला. 

भुईमूग शेंगाची आवक सुरुच आहे. मागील आठवड्यात दररोज २० क्विंटलपर्यंत आवक होऊन आवक होऊन चार हजार ते सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. दुधी भोपळ्याची ५५ क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते साडेतीन हजार रुपये, मका कणसाची १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते दिड हजार, शिमला मिरचीची ३५ क्विंटलपर्यंत आवक होऊन तीन हजार ते साडेचार हजार रुपयांचा दर मिळाला आहे. मेथी, कोथिंबीर, पालक, चुका, करडी भाजी, चवळी, बीट यालाही चांगली मागणी राहिली आहे.

सिताफळ दोन ते सात हजार

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सिताफळाची आवक सुरु झाली आहे. येथे दररोज २ ते ४ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते सात हजार रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळत आहे.मोसंबीची ४०क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते तीन हजार, संत्राची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते सहा हजार, पपईची १७ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ३ हजार, पेरूची ७ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते साडेचार हजार केळीची २० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते साडेतीन हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT