lemon, Mango, watermelon Agrowon
मार्केट ट्रेंड

लिंबू, आंबा, तेजीत; कलिंगड, पपई स्थिर

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४ ते ९ एप्रिल दरम्यान प्रत्येक फळपिकांच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) गत आठवडाभरात आवक झालेल्या फळ (Fruits Crop) पिकांमध्ये लिंबू, आंब्याचे दर तेजीत राहिले. कैरी, पपई, खरबूजचे (Carrie, papaya, melon) दर जवळपास स्थिर राहिले. द्राक्षाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४ ते ९ एप्रिल दरम्यान प्रत्येक फळपिकांच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला. चिकूची ३८२ क्‍विंटल आवक (Chiku 382 quintals income) झाली. १९ ते २३१ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या चिकूला सरासरी १२५० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. द्राक्षाची आवक २२४ क्विंटल झाली. ३३ ते ५२ क्विंटल दरम्यान कमी-अधिक प्रमाणात आवक झालेल्या द्राक्षाला सरासरी ४२५० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. खरबुजाची (Melon) आवक ९०६ क्विंटल झाली. १०९ ते ३४९ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या खरबूजला सरासरी १८०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. लिंबूची आवक अल्पच झाली.

८ ते २५ क्विंटल दरम्यान कमी-अधिक मिळून ९० क्विंटल आवक झालेल्या लिंबूचे सरासरी दर १० हजार ५०० ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. लिंबू (Lemon) पाठोपाठ आंब्याची (Mango) ही आवक नगण्यच राहिली. ५ ते १४ क्विंटल दरम्यान कमी-अधिक मिळून ४१ क्विंटल आवक झालेल्या आंब्याला १४ हजार ते १९ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला. कैरीची आवक ३२६ क्विंटल झाली. ४२ ते १०८ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या कैरीला सरासरी २००० ते २३५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला. पपईची आवक १९८ क्विंटल झाली. १२ ते १०९ क्विंटल दरम्यान कमी-अधिक प्रमाणात आवक झालेल्या पपईचे सरासरी दर १००० ते १३५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी कळविले.

कलिंगडाची सर्वाधिक आवक (The highest inflow of watermelon)
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४ ते ९ एप्रिल दरम्यान कलिंगडाची सर्वाधिक २५६१ क्‍विंटल आवक झाली. २१७ ते ७२७ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या कलिंगडाला सरासरी ८५० ते १००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT