Banana Market Agrowon
मार्केट ट्रेंड

Banana Market : केळी आवकेसह दरातही सुधारणा

Banana Rate : देशात श्रावणमास सुरू आहे. यात आपल्या भागातही सोमवारी (ता. ५) श्रावणमास सुरू झाल्याने केळीला स्थानिक बाजारातही उठाव आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : देशात श्रावणमास सुरू आहे. यात आपल्या भागातही सोमवारी (ता. ५) श्रावणमास सुरू झाल्याने केळीला स्थानिक बाजारातही उठाव आहे. केळी दरात सुधारणा झाली असून, कमाल दर शिवार खरेदीत १८०५ प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत पोचला आहे.

खानदेशात केळीच्या शिवार खरेदीसंबंधीचा कमाल दर १७०० रुपये प्रतिक्विंटल एवढा मागील आठवड्यात होता. मागील आठवड्यात केळी आवकेत वाढ झाली. सध्या खानदेशात केळीची प्रतिदिन २४० ट्रक (एक ट्रक १६टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवकेत २० ते २२ ट्रकने मागील तीन - चार दिवसात वाढ झाली आहे.

चोपडा व जळगाव भागात कांदेबाग केळीसंबंधी प्रतिक्विंटल १८०५ रुपये कमाल दर आहे. तर केळीचा किमान दर ९००ते ११०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. देशात उत्तरेकडे श्रावणमास अंतिम टप्प्यात आहे. तर राज्यात सोमवारी श्रावणमास सुरू झाला आहे. यामुळे स्थानिक बाजारासह उत्तरेकडेही केळीला मागणी आहे. यामुळे आवक वाढूनही केळी दरात सुधारणा झाली आहे.

केळीची निर्यातही सुरू असून, जळगावातून रोज सध्या पाच कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळी आखातात पाठविली जात आहे. या केळीसही कमाल १८०० रुपये प्रतिक्विंटलवर दर मिळत आहे. दर्जेदार केळी खानदेशातील जळगाव, नंदुरबार, धुळे भागात उपलब्ध आहे. सर्वाधिक केळी चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव आदी भागांत उपलब्ध आहे.

मध्य प्रदेशातही दरवाढ

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरच्या बाजारातही केळी दरात वाढ झाली असून, तेथे रविवारी (ता. ४) लिलावात केळीला कमाल २२५० रुपये प्रतिक्विंटल व किमान १४७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तेथेही आवक वाढली आहे. परंतु उत्तरेकडे खानदेशातील केळीला मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ

APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार

Heavy Rainfall: नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या कपाशीची वाताहत

Cooperative Bank Award: उत्कृष्ट सहकारी संस्थांना सन्मानाची ढाल प्रदान

SCROLL FOR NEXT