Jalgaon News : जळगाव केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथील केळी रावेर रेल्वे स्थानकातून वॅगन्समधून भरून बाहेर पाठवली जातात. मात्र पहिल्यांदाच येथील रावेर ऐवजी निंभोरा रेल्वे स्थानकातून केळी भरल्याने फळबागातयदार शेतकरी मंडळ आणि केळी उत्पादकांसह कामगारांत मोठा अंसतोष निर्माण झाला. यावेळी केळी उत्पादकांनी केळी भरण्याचे स्थान बदलल्याने नाराजी व्यक्त केली. तर केळी भरणाऱ्या कामगांचा रोजगार बुडाल्याने कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावरून रावेर युनियनचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी शेतकरी आणि मंडळाशी समन्वय ठेवून काम केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
जून महिन्यापासून रावेर येथील रेल्वे स्थानकातून केळी वॅगन रॅक लावून भरली जाते. पण शनिवारी (ता. ३) मंडळाने स्थान बदलले. तर वॅगन निंभोरा रेल्वे स्थानकावर भरण्यात आली यामुळे फळबागायतदार मंडळासह केळी उत्पादकांत संभ्रम निर्माण झाला. यातून असंतोष वाढल्याने केळी उत्पादकांसह कामगारांमध्ये नाराजी समोर आली.
यावेळी रावेर युनियचे अध्यक्ष पाटील यांनी, फळबागायतदार शेतकरी मंडळ आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना खोटी आणि चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यातून युनियनबाबत गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळेच निंभोरा फळबागायतदार शेतकरी मंडळाचे अध्यक्ष कडू चौधरी यांच्याशी चर्चा केल्याचे पाटील म्हणाले. तर येथून पुढे आपण निंभोरा फळबागायतदार शेतकरी मंडळाशी समन्वय साधून सहकार्य ठेवून काम करू, असेही पाटील यांनी आश्वासन यावेळी दिले.
तसेच निंभोरा येथून केळी वॅगन भरली याचा अर्थ जागा बदलली असा होत नाही. आम्ही रावेर येथून वॅगन लावून केळी भरणार आहोत. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले. तसेच आमचा कोणालाही मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न नसून कोणाचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली. तर काही कारणास्तव निंभोरा येथून केळी भरण्यात आली आहेत. पण यापुढे रावेर येथूनच केळी वॅगन भरली जाईल असेही स्पष्टीकरण पाटील यांनी यावेळी दिले.
कामगारांत रोष
निंभोरा येथे वॅगन लागल्याने रावेरमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी भरून थेट तिकडे नेली. तर तेथीलच कामगार लावून ते भरले. रावेर येथील स्थानिक केळी कामगारांचा रोजगार बुडाला. यामुळे येथील कामगारांच्यामध्ये देखील रोष पाहायला मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.