Brinjal Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Brinjal Market : भरताच्या वांग्याच्या आवकेत वाढ; मागणीही टिकून

Market Update : राज्यात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या भरताच्या वांग्याची आवक विविध बाजारांत वाढत आहे. बाजारात शेतकऱ्यांना प्रतिकिलो १५ ते २० रुपये व सरासरी १८ रुपये, असा दर मिळत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : राज्यात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या भरताच्या वांग्याची आवक विविध बाजारांत वाढत आहे. बाजारात शेतकऱ्यांना प्रतिकिलो १५ ते २० रुपये व सरासरी १८ रुपये, असा दर मिळत आहे. विविध कार्यक्रमांच्या मेजवानीत भरताचा मेनू दिसू लागला आहे.
भरताच्या वांग्याची आवक दीपोत्सवाच्या काळात जळगावात अधिक होती.

नोव्हेंबरच्या मध्यात आवक कमी झाली. तसेच या महिन्यातही सुरुवातीला आवक कमी होती. परंतु मागील आठ ते १० दिवसांपासून भरीत वांगी दरात सतत घट झाली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला भुसावळ, जळगाव भागांत आवक सुरू होते. तर ऑक्टोबरच्या अखेरीस यावल, रावेर या भागांत भरताच्या वांग्याची आवक, काढणी सुरू होते.

यंदा भरीत वांगी पिकाला अनुकूल वातावरण होते. यामुळे उत्पादनही वेळेत व जोमात येत आहे. सध्या जळगाव, भुसावळ येथील बाजारांत भरीत वांग्याची सर्वाधिक आवक होत आहे. जळगावात रोज १८ ते २० क्विंटल भरताच्या वांग्याची आवक होत आहे. किरकोळ बाजारातील दर २० ते २५ रुपये प्रतिकिलो, असे आहेत.

यावलमधील बामणोद, भालोद, न्हावी, पाडळसे, सांगवी बुद्रुक, रावेरातील मस्कावद, रोझोदा, खिरोदा, चिनावल भागांतील दर्जेदार वांग्याची आवक बऱ्यापैकी आहे. तसेच भुसावळातील पिंपळगाव, तळवेल, वरणगाव, शिंदी, पिंप्रीसेकम या भागांतही भरीत वांग्यांचे उत्पादन सुरू झाले आहे.

जळगावमधील आसोदा, तरसोद, नशिराबाद, बेळी, जळगाव खुर्द, तुरखेडा, विदगाव या भागांतही भरीत वांग्यांचे उत्पादन घेतले जाते. यावल, रावेर, जळगाव भागांतील आठवडी बाजारांत भरताच्या वांग्यांना चांगली मागणी असते. भुसावळ, जळगाव भागांत गोलाकार, मोठ्या आकारातील भरताची वांगी येत आहेत. तसेच भडगाव, एरंडोल, जामनेर भागांतही काही शेतकऱ्यांनी भरीत वांगी पिकाची लागवड केली आहे.

आवक वाढल्याने दरांवर दबाव

भरीत वांग्याची आवक सतत वाढल्याने दरांवर दबाव तयार झाला आहे. अलीकडे रावेर, भुसावळ, यावल, जळगाव, मुक्ताईनगरसह जामनेर, भडगाव, चोपडा धुळ्यातील शिरपुरातही भरीत वांगी पीक वाढले आहे. यामुळे आवक सर्वत्र अधिक आहे. परिणामी, दर कमी आहेत. सध्या प्रतिदिन १०० ते १२५ क्विंटल भरीत वांग्याची आवक खानदेशात होत आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: पावसाने उभ्या पिकांचे नुकसान

Pune Rain Update: खडकवासला परिसरात विक्रमी १०४ मिमी पाऊस

Political Crime Case: आमदार प्रवीण तायडेंच्या भावाला ठार मारण्याचा कट

Agriculture Department Crackdown: ‘एचटीबीटी’ रोखण्यासाठी भरारी पथके

Revenue Department Services: महसूल विभागाच्या सेवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत बंद

SCROLL FOR NEXT