Agriculture Department Action: एचटीबीटी कापूस बियाण्याची तस्करी रोखण्यासाठी राज्यभर भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी (ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसरः एडीओ) या पथकाचे प्रमुख असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. .जिल्हा परिषदेचा मोहीम अधिकारी, तसेच संबंधित तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) या पथकाचे सदस्य असतील. तर, सदस्य सचिव म्हणून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक काम बघतील..HTBT Cotton Seeds: ‘एचटीबीटी’चा सावळागोंधळ.जिल्हा परिषदेच्या एडीओला पथकाचे अध्यक्ष करताना या कामाचे समन्वयक अधिकारी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला (सीनियर ॲग्रिकल्चर ऑफिसर ः एसएओ) जबाबदारी देण्यात आली आहे. या पथकाला एसएओने वेळोवेळी मार्गदर्शन करणे अपेक्षित राहील..सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एचटीबीटी (तणनाशक सहनशील जनुकीय परावर्तित) कापूस बियाण्यांची तस्करी वाढली आहे. आंतरराज्य टोळ्यांचा सहभाग, बियाणे विक्रेत्यांचा छुपा पाठिंबा, शेतकऱ्यांना गुपचूप बियाणे विकण्याचे वाढते प्रकार, गुणनियंत्रणाची तोकडी यंत्रणा अशा विविध कारणांमुळे तस्करीवरील नियंत्रण आता कृषी विभागाच्याही हाताबाहेर गेले आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कृषी विभागाने यापूर्वी एक विशेष तपासणी पथक नेमले होते. या पथकानेच जिल्हानिहाय पथके तयार करण्याची शिफारस केली होती..Illegal HTBT Cotton Seed: जांगडगुत्ता ‘एचटीबीटी’चा!.‘‘जिल्हा पथकाने एचटीबीटीची वाहतूक, साठवणूक, विक्री शोधावी. बियाणे सापडताच प्रथम पोलिसांकडे गुन्हा दाखल करावा. तसेच, तस्करीच्या घटनेची माहिती तात्काळ राज्य पथकाला कळवावी. पथकाने केवळ पेरणीपूर्व काम न करता वर्षभर एचटीबीटीवर नजर ठेवावी, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. अर्थात, हंगाम सुरू झाल्यानंतर उभी ठाकणारी इतर आव्हाने लक्षात घेता हे पथक कितपत काम करेल, याविषयी शंका वाटते,’’ असे एका गुणनियंत्रण निरीक्षकाने स्पष्ट केले..बियाणे कंपन्यांसाठी चाचण्या बंधनकारकराज्यातील सर्व कापूस बियाणे कंपन्यांना शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्या जात असलेल्या बियाण्यांमध्ये तणनाशक सहनशील घटक नसल्याची खात्री करावी लागेल. त्यासाठी लॉटनिहाय चाचण्या कराव्या लागतील. या चाचण्या केवळ कृषी विद्यापीठे व सरकारी संशोधन केंद्रांवर होतील, असे गुणनियंत्रण निरीक्षकांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.