Onion Export
Onion Export Agrowon
मार्केट बुलेटीन

Onion Rate : नाफेड कांदा दराला आधार देईल का?

टीम ॲग्रोवन

सोयाबीन दर स्थिरावले

1. देशातील बाजारात सोयाबीन दर स्थिरावले आहेत. अनेक बाजारात नव्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. तर पेरणीही जवळपास पूर्ण झाली. देशात आजपर्यंत १२० लाख ७० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. सोयाबीनचा हा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत केवळ ८ हजार हेक्टरनं पिछाडावर आहे. तर सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसानं पिकाचं नुकसानही होतंय. सध्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हंगामाच्या सुरुवातीला हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

कापूस यंदाही भाव खाणार

2. सध्या कापसालाही चांगला दर मिळतोय. मागील ८ ते १० दिवसांपासून देशातील अनेक भागांत पाऊस पडतोय. राज्यातही चार दिवसांपासून बहुतांशी ठिकाणी पाऊस झाला. या पावसानं माॅन्सूनपूर्व कापूस लागवडीचं नुकसान वाढलंय. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि पंजाब तसंच तेलंगणातील काही भागांत कापूस पिकाचं नुकसान वाढलंय. कापूस उत्पादन यंदा वाढण्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी ऑक्टोबरच्या शेवटी चित्र स्पष्ट होईल. सध्या कापसाला मागणी असल्यानं ८ ते १० हजार रुपयांचा दर मिळतोय. मात्र नव्या कापसात ओलावा जास्त असतो. त्यामुळं या कापसाला ८ ते ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

तुरीचे दर टिकून राहणार

3. देशात सध्या तुरीसह इतर कडधान्याचे दर वाढलेले आहेत. केंद्रीय कृषी विभागानं आज प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार देशातील कडधान्य लागवड ४ टक्क्यांनी घटली. यात तुरीचा पेरा जवळपास ५ टक्के कमी झालाय. तर उडीद आणि मुगाची लागवडही ६ टक्क्यांनी घटली. आधीच पुरवठा कमी आणि त्यात पेराही घटल्यानं या तीनही कडधान्याचे दर तेजीत आहेत. यात तुरीला चांगला दर मिळतोय. सध्या तुरीचे व्यवहार ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगातून व्यक्त होतोय.

ढोबळी मिरची खातेय भाव

4. राज्यातील बाजारात ढोबळी मिरचीला सध्या चांगला दर मिळतोय. ढोबळी मिरचीची बाजारात आवक सध्या नगण्य आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर या बाजारात १०० क्विंटलपेक्षा जास्त आवक होतेय. मात्र इतर बाजार समित्यांधील आवक ही ३० क्विंटलपेक्षा कमीच आहे. त्यामुळं ढोबळी मिरची भाव खातेय. या मिरचीला सध्या २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळतोय. तसंच बाजारात ढोबळ्या मिरचीची आवक लगेच वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला व्यावसायिकांनी व्यक्त केलाय.

नाफेड कांदा दराला आधार देईल का?

5. कांद्याचा हंगाम (Onion Season) यंदा शेतकऱ्यांची कसोटी पाहणाराच ठरतोय. कारण कांदा बाजारात (Onion Arrival) दाखल झाल्यापासून दर दबावात आहेत. केंद्र सरकारच्या मते यंदा देशातील कांदा उत्पादन (Onion Production) २० लाख टनांनी वाढून १३६ लाख ७० हजार टनांवर पोचलं. त्यातच रब्बीचा माल तयार होण्यास उशीर झाल्यानं दोन हंगामातील माल एकाचवेळी बाजारात दाटला. त्यामुळं उन्हाळ कांद्यालाही कमी दर (Onion Rate) मिळतोय. बाजारातील आवक जास्त असल्यानं दर दबावात आहेत. या परिस्थितीत कांदा निर्यात होण गरजेचं आहे. मात्र सरकारनं निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळं निर्यातही होत नाहीये. त्यामुळं कांदा दरावरील दबाव कायम राहिला.

श्रीलंका भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करत असते. मात्र सध्या श्रीलंकेत आर्थिक संकट सुरु आहे. त्यामुळं निर्यातही थांबलीय. पाकिस्तानलाही कांद्याची टंचाई जाणवतेय. मात्र दोन्ही देशांतील राजकीय संबंधांमुळं कांदा निर्यातीबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडनेच बाजारात उतरून खरेदी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री पीयूष गोयल यांना नाफेडमार्फत दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची विनंती केली आहे. नाफेडने यापूर्वीच २ लाख ३८ हजार टन कांदा खरेदी केलाय. सध्या बाजारात कांद्याला १ हजार ते १४०० रुपये दर मिळतोय. नाफेडने आणखी दोन लाख टन खरेदी केल्यास बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT