Urad Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Urad Market Rate : उडदाचे भाव तेजीत का आले?

Team Agrowon

१) सोयाबीनची आवक स्थिर (Soybean Arrival)

देशातील बाजारात आज सोयाबीनची आवक १ लाख १० हजार टनांच्या दरम्यान राहीली. तर सोयाबीनचे दर आजही दबावात होते. सोयाबीनला सरासरी ४ हजार ७०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

बाजारातील सोयाबीन आवक आखी काही दिवस अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यातच खाद्यतेलाचे भाव दबावात असल्याने सोयाबीनला उठाव मिळताना दिसत नाही. परिणामी सोयाबीन दरावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) कापूस वायद्यांमध्ये नरमाई (Cotton Arrival)

देशातील कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी नरमाई दिसली. आज महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने वायदे ३०० रुपयांनी कमी होऊन ५८ हजार ६८० रुपये प्रतिखंडीवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे ८४ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

देशातील बाजारातील कापूस आवक आज १ लाख ५ हजार गाठींच्या दरम्यान होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर कापसाला देशभरात सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळाला. कापसाचे भाव आणखी काही दिवस दबावात राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

३) आले दरातील तेजी टिकून (Ginger Rate)

आल्याच्या भावातील तेजी सध्या टिकून आहे. महत्वाच्या बाजारातील आल्याची आवक सध्या कमी झालेली आहे. तर दुसरीकडे आल्याला मागणी चांगली आहे. त्यामुळे आल्याचे दर तेजीत आहेत.

आल्याला सध्या प्रतिक्विंटल ८ हजार ते १२ हजार रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे. यंदा आल्याचे उत्पादन घटले. पुरवठा कमी असल्याने आल्याचे भाव पुढील काळातही कायम राहतील, असा अंदाज आले बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

४) पपईला चांगला उठाव (Papaya Rate)

बाजारात सध्या पपईला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील पपईची आवक कमी दिसते. तर उठाव चांगला आहे. वाढत्या उन्हामुळे फळांना मागणी वाढली. याचा फायदा पपईलाही मिळत आहे.

सध्या महत्वाच्या बाजारात पपईची आवक अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे पपईला प्रतिक्विंटल १ हजार २०० ते २ हजार रुपयांचा दर मिळत आहे. पपईचा हा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज पपई बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) उडदाचे भाव पुढील काळात टिकतील का? (Urad Rate)

यंदा देशातील उडीद उत्पादनात मोठी घट झाल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. देशात यंदा २६ लाख टन उडीद उत्पादन झाल्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला. गेल्या हंगामात देशात जवळपास २८ लाख टन उत्पादन झाले होते.

तर ग्लोबल पल्सेस काॅनक्लेव अर्थात जीपीसीमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा भारतातील उडदाचे उत्पादन २१ लाख टनांवर स्थिरावले. तर म्यानमारमध्ये ७ लाख ५० हजार टन उडीद झाला. इतर देशात उडीद उत्पादनाचे प्रमाण कमी आहे. जीपीसीच्या मते यंदा जागतिक पातळीवर २८ लाख ६० हजार टनांवर पोचले.

उडीद वापराचा विचार करता यंदा भारतात २५ लाख टनांचा वापर होणार आहे. भारताचा विचार करता उत्पादनापेक्षा वापर ४ लाख टनांनी अधिक राहील. त्यामुळे भारताला म्यानमारकडून आयात करून गरज भागवावी लागेल. भारताची गरज लक्षात घेऊन म्यानमारमधील निर्यातदारांनीही दर वाढवले.

परिणामी उडदाचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीत आहेत. सध्या देशातील बाजारात उडदाला ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा उडदाचा तुटवडा आहे.

त्यामुळे पुढील हंगामासाठी शिल्लक साठा खूपच कमी राहील. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात अनेक भागात कमी पावसाचा अंदाज आहे. परिणामी पुढील काळातही उडीद चांगलाच भाव खाऊ शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT