Soybean
Soybean  Agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean : अमेरिकेत सोयाबीन उत्पादनाची स्थिती काय ?

टीम ॲग्रोवन

तुरीची पेरणी २० टक्क्यांनी कमीच

देशात आजपर्यंत जवळपास ९१ लाख हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला. गेल्यावर्षी याच काळात झालेल्या लागवडीच्या तुलनेत यंदा साडेसहा टक्के लागवड अधिक झाली. मात्र तुरीचा पेरा २० टक्क्यांनी घटलाय. मागीलवर्षी २२ जुलैपर्यंत ३९ लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. मात्र यंदा ३१ लाख हेक्टरपर्यंत पेरा झाला. सरकारच्या धोरणांमुळं बाजारात तुरीचे दर पडले होते. त्यामुळं शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी दर मिळाले. त्यामुळं चालू हंगामात तुरीची लागवड कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. पेरणीतील ही घट अशीच राहिल्यास यंदा उत्पादनात मात्र मोठी घट येण्याची शक्यता आहे.

देशात गव्हाच्या दरात पुन्हा सुधारणा

देशातून निर्यात वाढल्याने गव्हाचे दर वाढले होते. त्यामुळे केंद्राने १३ मे रोजी गहू निर्यातबंदी केली. मात्र देशातील घटलेलं उत्पादन आणि वाढलेल्या मागणीमुळं दर पुन्हा सुधारले. दरातील वाढ आत्तापर्यंत कामय आहे. एक जुलै ते २२ जुलै या काळात देशभरात गहू दरात १०० ते २५० रुपयांची वाढ झाली. सरकार अद्यापही काही राज्यांतून गहू खरेदीचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे खुल्या बाजाराला आधार मिळतोय. परिणामी खुल्या बाजारात गहू दर सुधारले. २२ जुलै रोजी देशात २१०० ते २५०० रुपये सरासरी दर मिळाला.

खतासाठी भारताची इतर देशांत गुंतवणूक

चालू खरिपात देशातील विविध भागांत खतांची टंचाई जाणवतेय. तर युरिया, पोटॅश आणि डीएपी यासारख्या प्रमुख खतांच्या किंमती आभाळाला भिडल्यात.रशिया आणि बेलारूस यासारख्या प्रमुख खत उत्पादक देशांनी निर्यातीवर बंधनं आणली आहेत. तसेच मोरोक्का आणि चीनमध्ये खतांचं उत्पादन घटलं आहे. जागतिक बाजारपेठेत खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा आहे. रशिया-युक्रेन युध्दामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. त्यामुळे खतांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. देशात खतांची टंचाई आणि भाववाढ यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार जगातील प्रमुख खत उत्पादक देशांमध्ये आर्थिक गुंतवणूक करणार आहे. तसेच या देशांबरोबर खत आयातीसाठी दीर्घ कालावधीचे करार करणार आहे.

जगात खाद्यतेल उत्पादन आणि वापर वाढण्याचा अंदाज

मागील वर्षात जगात खाद्यतेल उत्पादन जवळपास ४५ लाख टनांनी वाढलं होतं. पण तरीही वाढलेल्या मागणीमुळे जगात खाद्यतेलाचे दर विक्रमी पातळीवर पोचले होते. यंदा जागतिक पातळीवर तेलबिया आणि खाद्यतेलाचे उत्पादन वाढेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केलाय. परंतु विविध देशातील पिकांची स्थिती पाहता अंदाजाप्रमाणे उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच आहे. मात्र खाद्यतेल उत्पादन वाढल्यास दर कमी होण्यास मदत होईल. पण खाद्यतेल वापरही वाढण्याची शक्यता आहे, असं जाणकारांनी सांगितलं.

अमेरिकेत सोयाबीन उत्पादनाची स्थिती काय ?

जगात २०१८ पर्यंत सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) अमेरिका आघाडीवर होता. पण पोषक वातावरण आणि सिंचनाच्या सुविधांमुळं ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात (Brazil Soybean Production) मोठी वाढ झाली. त्यामुळं ब्राझीलनं अमेरिकेला सोयाबीन उत्पादनात (America's Soybean Production) मागं टाकलं. २०२२-२३ मध्ये अमेरिकेत गेल्यावर्षीपेक्षा अधिक उत्पादन होईल, असं युएसडीएनं म्हटलंय. मागील वर्षी अमेरिकेत १२०.७ दशलक्ष टन उत्पादन झालं होतं. मात्र यंदा उत्पादन १२२.६ दशलक्ष टनांवर राहील, असा अंदाज युएसडीएनं जुलैच्या अहवालात म्हटलंय. पण जून महिन्यातील अहवालात १२६ दशलक्ष टनांचा अंदाज दिला होता. म्हणजेच एका महिन्यात उत्पादनाच्या अंदाजात ३.४ दशलक्ष टनांची कपात करण्यात आली. कारण सध्या अमेरिकेतील अनेक भागांत दुष्काळी स्थिती आहे.

सोयाबीन पिकाला पाणी कमी पडत असल्याचे वृत्त अनेक भागांतून आले. काही ठिकाणी मागील आठवड्यात पाऊस झाला. पण उष्णता वाढल्यानं त्याचा पिकाला फायदा झाला नाही. पण या उष्णतेचा सोयाबीन उत्पादकतेवर कहीच परिणाम होणार नाही, असं अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हटलंय. युएसडीएचा दावा जास्त उत्पादनाचा असला तरी ऐन शेंगा भरण्याच्या काळात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळं याचा उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असं येथील काही संस्थांनी सांगितलं. सोयाबीन हंगामाचा विचार केला तर अमेरिकेचं पीक सर्वात आधी बाजारात येतं. तसंच अमेरिकेच्या पिकावरून अनेकदा बाजाराचा अंदाजही लावला जातो. त्यामुळं अमेरिकेत किती सोयाबीन उत्पादन होतं हे पाहणं गरजेचं ठरतं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT