Chana Rate
Chana Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हरभऱ्याला सध्या बाजारात काय भाव मिळतोय?

Team Agrowon

१) सोयाबीनवरील दबाव कायम (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजाराते सोयाबीन आणि सोयापेंडवरील दबाव कायम आहे. ब्राझील आणि अर्जेंटीनाचं सोयाबीन बाजारात आल्याने दर घसरल्याचं सांगितलं जातं. सध्या सोयाबीनचे वायदे हंगामातील निचांकी पातळीवर असून १४.०४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आहेत.

तर सोयापेंडचे वायदे ४२५ डाॅलर प्रतिटनांवर आहेत. देशातील सोयाबीन दरावरही दबाव आहे. सोयाबीनला सध्या ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळतोय. सोयाबीनचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस दर काहीसे नरमले (Cotton Rate)

देशातील कापूस बाजारावर आवकेचा दबाव कायम असल्याचं दिसतं. सध्या बाजारात आवक जास्तच आहे, असं व्यापारी सांगत आहेत. सध्या दैनंदिन आवक सव्वा लाख गाठींच्या पुढेच आहे. त्यामुळे दरावर दबाव आहे.

सध्या कापसाला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार १०० रुपयांचा दर मिळतोय. कापसाची आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होईल. कारण कापसाचा स्टाॅक कमी होतोय. त्यामुळं कापसाचे भाव पुन्हा सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) हळद भावात किंचित सुधारणा (turmeric Rate)

हळदीच्या दरात मागील काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसली. वायद्यांमधील सुधारणा काहीशी अधिक होती. वायद्यांमध्ये हळदीला ७ हजार १२४ रुपये भाव मिळाला. तर हजर बाजारातील भाव ६ हजार ५२४ रुपये होता. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळालेला सरासरी भाव ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

बाजारात हळदीची आवक वाढत आहे. आवेकचा दबाव असेपर्यंत हळद या दरपातळी दरम्यान राहू शकते, असा अंदाज हळद बाजारातील व्यापारी आणि निर्यातदारांनी व्यक्त केला.

४) लसणाचा बाजार तेजीतच

बाजारातील लसणाची आवक मर्यादीत होत आहे. त्यामुळे लसणाचे भाव स्थिर आहेत. राज्यातील पुणे आणि मुंबई बाजार समित्या वगळता इतर बाजारांमधील आवक सरासरी ५० क्विंटलपेक्षाही कमी आहे.

त्यामुळं सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ९ हजार रुपये भाव मिळतोय. लसणाची आवक पुढील काळातही कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं लसणाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) हरभऱ्याला काय भाव मिळतोय? (Chana Rate)

नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. नाफेडच्या खरेदीचा आधार मात्र खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाही. खुल्या बाजारात हरभरा भाव आजही हमीभावापेक्षा किमान ७०० रुपयाने कमी असल्याचं दिसतं. नाफेडने आतापर्यंत देशात १६ लाख ३१ हजार टन हरभरा खरेदी केला. यापैकी जळपास ६ लाख टन हरभरा महाराष्ट्रात खरेदी केला.

तर मध्य प्रदेशात ५ लाख २५ हजार टनांची खेरदी झाली. सध्या आठ राज्यांमध्ये नाफेडची हरभरा खरेदी सुरु आहे. नाफेडची खरेदी जोमाने सुरु असली तरी खुल्या बाजारातील दर मात्र सध्या दबावातच दिसतात. याचं कारण म्हणजे यंदा उत्पादन चांगलं होऊनही सरकारला हरभऱ्यासह कडधान्याचे भाव वाढू द्यायचे नाही.

शेतकऱ्यांचा हरभरा बाजारात येण्याच्या काळातच सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्याचे सरकारने सांगितले आहे. याचा मानसिक दबाव बाजारावर आहे. त्यामुळं दरही दबावात आहेत.

सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारातील आवक पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं या काळात सध्याची दरपातळी टिकून राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT