Amravati News: संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत संत्रापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. त्यामुळे सध्या बाजारात संत्रा फळांचे दर दर्जानुसार प्रति टन २० ते ३५ हजार रुपयांवर टिकून असल्याची माहिती मोर्शी येथील संत्रा प्रक्रिया उद्योजक नवीनकुमार पेठे यांनी दिली. .संत्रा उत्पादक आंबिया आणि मृग बहरातील फळांचे उत्पादन घेतात. त्यानुसार आंबिया बहरातील फळे सप्टेंबरपासून उपलब्ध होतात. सरासरी ३० डिसेंबरपर्यंत या हंगामातील फळांची उपलब्धता होते. सुरुवातीच्या काळात तापामानातील वाढ आणि त्यानंतर पावसाची संततधार अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिणामी संत्रापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला..Orange Farmer Issue: वरुडबाजार समितीच्या संमतीने होतेय संत्रा बागायतदारांची लूट .यातूनच फळगळतीच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. अमरावती जिल्ह्यात नागपुरी संत्र्याखालील सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यामुळे या भागातील बागायतदारांना नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला. उत्पादकता घटल्याने त्याचा परिणाम हंगामाच्या सुरुवातीला दरातील तेजीच्या माध्यमातून दिसून आला. आंबिया बहरातील फळांना सुरुवातीच्या काळात ६४ हजार रुपये प्रति टन असा उच्चांकी दर मिळाला. यापुढील काळात देखील हाच दर टिकून राहील, अशी अपेक्षा बागायतदारांना होती..मात्र त्यानंतर हे दर कमी होत ५५, ५० आणि त्यानंतर ४०, ३५ हजार रुपये टन आणि आता थेट ३२ हजार रुपये टनांवर पोहोचले आहेत. उच्चांकी दर मिळणाऱ्या फळांमध्ये चांगल्या प्रतीच्या फळांचा समावेश आहे, असे श्री. पेठे सांगतात. यापूर्वी हंगामात अपवादात्मक स्थितीतच संत्रा फळांना ३० हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळाल्याची पुष्टी त्यांनी केली. गेल्या काही वर्षांत १८ ते २२ हजार रुपये टन या दरानेच संत्र्याचे व्यवहार होत होते..Nagpur Orange : सततचा पाऊस, किडीमुळे संत्र्यांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान.फळांची उपलब्धता कमी, दरात सुधारणासंततधार पावसामुळे झाडांची मुळे बराचवेळ पाण्यात राहिली. परिणामी, त्यांच्या अन्नद्रव्य घेण्याच्या कार्यावर परिणाम झाला. त्याबरोबरच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्याच्याही परिणामी संत्रापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. त्यामुळे यंदा हंगामात फळांची उपलब्धता कमी आहे. त्याच्याच परिणामी दरात काहीशी सुधारणा अनुभवली जात आहे..देशांतर्गत विविध राज्यांतून चांगल्या प्रतीच्या संत्रा फळाला मागणी वाढती आहे. रासायनिकऐवजी जैविक फळांची टिकवणक्षमता अधिक राहते. त्यामुळे बाजारात अशाच फळांचा पुरवठा करण्यावर सध्या भर आहे. त्यामुळे बाजारात दरही चांगला मिळत आहे. यंदाच्या हंगामात बागांमध्ये अपेक्षित सूर्यप्रकाश राहिला नाही. त्याचा परिणाम फळांच्या गुणवत्तेवर झाला असून अपेक्षित रंगधारणा दिसून येत नाही.नवीनकुमार पेठे, पीओजी, संत्रा प्रक्रिया उद्योग, भिवकुंडी, अमरावती.बाजारात दर टिकून असले तरी चांगल्या प्रतीच्या मालाची उपलब्धताच कमी आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे. राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या प्रकारच्या आकार आणि गुणवत्तेच्या फळांची मागणी राहते आणि त्यानुसारच पुरवठा करावा लागतो.जावेद खान, संत्रा प्रक्रिया उद्योजक, वरुड, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.