Onion  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा बाजारावर अधिसूचना निघाल्याचा काय परिणाम झाला?

Onion Market : आवकेचा दबाव वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.५२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३३३ डाॅलर प्रतिटनांवर होते. बाजारातील सोयाबीनची आवक आजही एक लाख ४० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. तर सरासरी भावही कायम आहेत.

सोयाबीनला आजही ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनच्या भावात पुढील काळातही भावात १०० रुपयांपर्यंतचे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच कापसाला चांगला उठाव आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे. निर्यातीलाही चांगली मागणी आहे. उद्योगांकडूनही खरेदी केली जात आहे. त्यामुळे कापसाला सरासरी भाव ७ हजार ७४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान मिळतोय.

बाजारातील ही स्थिती पुढच्या काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना बाजाराचा आढावा घेऊनच विक्री करावी, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले. 

देशातील बाजारात तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार दिसून येत आहेत. तुरीची बाजारातील आवक कमीच असून मागणी मात्र चांगली आहेत. त्यातच सण आणि लग्न समारंभामुळे तुरीच्या भावाला चांगला आधार मिळू शकतो.

सध्या तुरीचा सरासरी भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत. यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे. यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने कोटा ठरवून दिल्याप्रमाणे बहरीन, भुटान आणि माॅरिशस देशाला कांदा निर्यातीची अधिसूचना काढली. पण कांदा बाजाराला याचा आधार मिळाला नाही. देशातील सरासरी दरपातळी कायम दिसते. काही बाजारांमध्ये नवा माल दाखल होऊन त्याची गुणवत्ता कमी असल्यास भाव कमीच दिसत आहेत.

आवकेचा स्थिती कायम दिसते.  कांद्याची सरासरी भावपातळी आज १४०० ते १८०० रुपयांचा भाव मिळाला. पुढील दोन आठवड्यांनंतर बाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. पण आवकेचा दबाव वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आली आहे. बाजारातील वाढत्या आवकेचा टोमॅटोच्या भावावर परिणाम दिसून आला. टोमॅटोचा भाव काही बाजारांमध्ये १००० रुपये प्रतिक्विंटलपासून सुरु होत आहे.

तर सरासरी भावपातळी १ हजार २०० ते १ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटोच्या भावात नरमाई आल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. टोमॅटो बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये पुन्हा कमी होईल, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

SCROLL FOR NEXT