Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हळदीच्या भावातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद तसेच आल्याचे दर ?

Agriculture Update : आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, आले आणि काकडी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरावरील दबाव सोयाबीनच्या भावावरही आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १२.२६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

तर सोयापेंडचे वायदे ३६९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनवरील दबाव कायम आहे. सोयाबीनचा भाव आज ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. सोयाबीन बाजारामधील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आजही नरमले होते. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७५.३५ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे २०० रुपयांनी कमी होऊन ५५ हजार ९०० रुपये क्विंटलवर होते.

देशातील बाजारात कापसाची आवक मात्र कमी झाली. तरीही कापसाचा भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीच्या भावातील तेजी कायम आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही भाव चांगले होते. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे. पण दुसरीकडे मागणी चांगली आहे. बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला.

सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

काकडीला सध्या चांगला उठाव आहे. वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडी भाव खात असते. सध्या बाजारातील आवक आहे. त्यामुळे काकडीला चांगला भाव आहे. लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमुळेही मागणी आहे.

सध्या काकडीला राज्यभरात प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते १८०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर पुढील काळात बाजारातील काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर चांगले राहू शकतात, असाही अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

SCROLL FOR NEXT