Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोचा बाजार घसरला; कापूस, सोयाबीन, लसूण तसेच काय आहेत ज्वारीचे दर

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन बाजार निचांकी पातळीवर

सोयाबीन बाजाराचा आठवड्याचा शेवट मंदीनेच झाला. सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव दबावातच होते. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १०.२० डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयापेंड ३२४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचा उठाव कमीच

कापूस बाजारही आठवड्याच्या शेवटी दबावातच राहीला. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कापसाचा भाव मंदीत होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची विक्री वाढलेली आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६८.३१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५८ हजार रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लसणाचे भाव नरमले

राज्यात लसणाचे भाव नरमले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ज्वारीचे भाव दबावातच

ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे. बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली. ज्वारीचा बाजार सध्या दबावात आला आहे. राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे. पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला सरासरी वाणानुसार २ हजार ३०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.    

टोमॅटोचे भाव नरमले

बाजारात टोमॅटोची आवक वाढत आहे त्या प्रमाणात भावातही काही प्रमाणात नरमाई दिसून येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोचा भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. टोमॅटोचा सरासरी भाव ५ हजारांवरून घसरला आहे. आज टोमॅटोला सरासरी १८०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. राज्यातील अनेक भागात सध्या टोमॅटोची तोडणी सुरु होत आहे. त्यामुळे आवक हळूहळू वाढेल, असा अंदाज आहे. त्याचा दबाव दरावर येत आहे. दरावरील दबाव वाढतच जाईल, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT