Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : लसणाचे भाव नरमले ; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत ज्वारीचे दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, लसूण आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin

कापसावर पुन्हा दबाव

कापूस बाजारावरील दबाव आजही कायम आहे. कापसाचा भाव पुन्हा एकदा गेल्या चार वर्षातील सर्वाच निचांकी पातळीवर पोचला. कापसाची विक्री वाढत असून कापसाचा उठाव मात्र कमी आहे. त्यामुळे दरावर दबाव येत आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६७.२७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार २३० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन दबावातच

सोयाबीन बाजाराची आठवड्याची सुरुवातही मंदीनेच झाली. सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव दबावातच होते. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १०.१५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयापेंड ३२७ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लसणाचे भाव नरमले

राज्यात लसणाचे भाव नरमले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ज्वारीचे भाव दबावातच

ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे. बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली. ज्वारीचा बाजार सध्या दबावात आला आहे. राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे. पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला सरासरी वाणानुसार २ हजार ३०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.    

कांदा भाव स्थिरावले

कांद्याचा बाजार आज काहीसा स्थिरावला आहे. कांद्याला वाढलेल्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी मागणी कमी झाली होती. त्याचा परिणाम दरावर दिसून आला.  कांद्याला आजही सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IFFCO Nano NPK Fertilisers: 'इफको'च्या लिक्विड, दाणेदार नॅनो एनपीके खतांना केंद्राची मंजुरी, पीक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची

Water Storage: खानदेशात जलसाठा ६२ टक्क्यांवर

Shade Net House: शेडनेट हाउस उभारणीसाठी लागणारे कव्हरिंग साहित्य

Farmer Crisis: एकोणीस मार्चला का करायचा उपवास?

PMGSY Road Issue: सहा महिन्यांत ४६ कोटींचा रस्ता उखडला

SCROLL FOR NEXT