Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनमधील सुधारणा कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे आले दर

Commodity Market : नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, आले आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कालच्या तुलनेत सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.२२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२६ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसामध्ये सुधारणा

कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. मात्र कालपासून कापसाच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत वायदे ७२.४९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५९ हजार ३१० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याचा बाजार स्थिरावला

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य काढून टाकले. तसेच निर्यात शुल्कही ४० टक्क्यांवरून २० टक्के केले. यामुळे कांदा बाजारात मागील ती दिवसांमध्ये कांद्याचा भाव ५०० रुपयांनी वाढला होता. मात्र मागील दोन दिवसांमध्ये कांदा भाव काहीसे स्थिरावले. तर काही बाजारात कांद्याच्या दरात नरमाई देखील आली होती. आज कांद्याचा भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान अनेक बाजारात होता. कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याचे भाव टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

हरभऱ्यातील तेजी कायम

हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT