Cotton Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : बाजारातील कापसाची आवक आजही घटली

Market Update : कापसाला पुढील काळात आणखी उठाव राहू शकतो. त्यामुळे कापसाच्या भावातही सुधारणा होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. तर देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात हालचाली सुरुच आहेत. सोयाबीनला सध्या देशात सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळत आहे.

तर बाजारातील आवक अद्यापही टिकून आहे. बाजारातील आवकेचाही दरावर दबाव दिसून येत आहे. रोज बाजारात दीड ते पावणेदोन लाख क्विंटलची आवक होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर ही आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते, असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे. आजही देशातील बाजारात कापसाचे भाव सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारातील कापूस आवकही घटली आहे. कापसाची आवक आता १ लाख २५ हजार गाठींच्या दरम्यान झाली.

बाजारातील आवक कमी असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढेलेल्या भावामुळे कापसाला उठाव वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली. कापसाला पुढील काळात आणखी उठाव राहू शकतो. त्यामुळे कापसाच्या भावातही सुधारणा होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हळदीचा नवा  हंगाम सुरू झाला असून बाजारांमध्ये आवक काहीशी वाढली आहे. देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये हळदीची आवक वाढली. राज्यातील सांगली, सातारा, नांदेड, वसमत आदी बाजारांमध्ये नवा माल येत आहे. सध्या सांगली बाजार समितीत राजापुरी हळदीची ५ ते ६ हजार पोती, तर परपेठीची ७०० ते १००० पोत्यांची आवक होत आहे.

तर गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर टिकून आहेत. राजापुरी हळदीला प्रतवारीनुसार प्रति क्विंटल १३ हजार ते २२ हजार रुपये असा दर मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरुवातीला दर चांगले मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

लसणाच्या भावातील तेजी कायम आहे. लसणाचा भाव विक्रमी टप्प्यावर पोचला असून या भाातही लसणाला उठाव चांगला दिसतो. त्यामुळे भावाती तेजी आणखी काही महीने कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

यंदा दुष्काळी स्थितीचा पिकाला मोठा फटका बसला. यामुळे आवक कमी आहे. सध्या लसणाला सरासरी १८ हजार ते २५ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान लसणाला भाव मिळत आहे. लसणाच्या भावातील ही तेजी पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लाल मिरची पिकालाही यंदा दुष्काळाचा फटका बसला. लागवडीपासूनच मिरची पिकाला यंदा संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे पिकाचे उत्पादन वेगवेगळ्या भागात ५ ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरची पुरवठा कमी राहणार आहे.

ही परिस्थितीत लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत. त्यामुळे मिरचीच्या भावात २० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १५ हजार ते २५ हजारांचा भाव मिळत आहे. मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

SCROLL FOR NEXT