Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, मोसंबी आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

अमेरिकेतील सोयाबीनच्या काढणीची वाढलेली गती आणि चांगली उत्पादकता. तसेच ब्राझीलमध्ये पडलेल्या पावसामुळे पेरा वेळेवर होण्याची शक्यता निर्माण झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही कमी झाल्या. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरावर होत आहे. सोयाबीनचा भाव आज पुन्हा कमी झाला. सोयाबीनचे वायदे ९.७३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातली बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसातील चढ उतार कायम

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. चांगल्या उत्पादनाचे अंदाज, कमी झालेली मागणी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घट याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. यामुळे कापसाचा सुधालेला भाव पुन्हा कमी झाला. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वायदे ७१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजार समित्यांमध्येही कापसाची आवक वाढत आहे. कापसाचे भाव ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्याचे भाव स्थिरावले

कांद्याच्या भावातील चढ उतार कायम आहेत. वाढेल्या भावात कांद्याला उठाव कमी होत आहे. मात्र भाव जास्त कमी झाल्यानंतर बाजारातील आवक कमी होत आहे. कारण सध्या शेतकऱ्यांकडे कांदा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी कांद्याचा भाव एका पातळीपेक्षा कमी होताना दिसत नाही. सरकारचा दबावही कांदा बाजारावर कायम आहे. त्यामुळे परिस्थिती असतानाही कांदा दरात मोठी तेजी आलेली नाही. आज कांद्याचा भाव महत्वाच्या बाजारांमध्ये सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कांदा भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मोसंबीचे भाव नरमले

मोसंबीचा नवा हंगाम आता सुरु झाला. बाजारात नव्या मोसंबीचा माल सुरु झाला आहे. पण नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यातील मोसंबी पट्ट्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मोसंबी पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. गुणवत्ताही खालवली. यामुळे मोसंबीच्या भावावर दबाव आला. सध्या मोसंबीला ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मोसंबीची आवक पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने नुकसान झाल्याने गुवत्तापूर्ण मोसंबीला चांगले मार्केट राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

आल्याचा बाजार टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; मक्यात काहिशी सुधारणा,गव्हाचे भाव स्थिरावले तर कैरीला काकडीला उठाव

Bajari Awak: खानदेशात बाजरीची आवक सुरू; दर मात्र स्थिर

Pani Tanchai: नंदुरबारात पाणी टंचाईची शक्यता

Maharashtra Rain Alert : दोन दिवसांत पावसाला पोषक हवामान; राज्यातील अनेक भागात तापमान वाढल्याने उन्हाचा चटकाही वाढला

Agriculture Growth: भारतातील शेती क्षेत्रात आर्थिक वाढीस गती देण्याची मोठी क्षमता- निती आयोग

SCROLL FOR NEXT