Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीन दरात सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच पेरू दर काय आहेत?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, आले आणि पेरु पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनमध्ये सुधारणा

वायदे बाजाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे शुक्रवारी १० डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयातेलाचे वायदे ४२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे वायदे ३१३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीन स्थिर होते. सोयाबीनला बाजारात आजही ४ हजार ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सनी आज ४५५० ते ४७०० रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचा भाव स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापासाचे वायदे शुक्रवारी ७० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान बंद झाले होते. देशातील वायदे आज दुपारपर्यंत ५८ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भावापतळीही कायम दिसली. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याचा भाव स्थिरावला

देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. यंदा मक्याला इथेनाॅल क्षेत्राकडून चांगली मागणी आहे. तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरु आहे. तर दुसरीकडे मक्याचा पुरवठा आणि बाजारातील आवक कमी दिसत आहे. परिणामी मक्याचे टिकून आहेत. पण सरकार धोरणांकडे बाजाराचे लक्ष असून दरवाढीवर काहीसा दबाव दिसत आहे. सध्या मक्याला देशात सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याला यापुढच्या काळातही चांगला उठाव राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

पेरुची आवक वाढली

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून पेरुची आवक वाढली आहे. आवक वाढल्याचा परिणाम बाजाराभावावर दिसू येत आहे. तसेच सध्या राज्याच्या महत्वाच्या पेरू उत्पादक भागांमध्ये पाऊस सुरु आहे. दुसरीकडे पेरुला उठाव चांगला मिळत आहे. यामुळे पेरुच्या भावातही काहीशी सुधारणा झाली. सध्या बाजारात पेरुला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. पेरुचा बाजार आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज पेरु व्यापारी व्यक्त करत आहेत.  

आल्याचे भाव स्थिर

आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ५ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT