Soybean Market News Agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Market : अर्जेंटीना, ब्राझीलमध्ये सोयाबीन पिकाला कमी पावसाचा फटका?

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत आहेत. जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Anil Jadhao 

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) चढ-उतार होत आहेत. जागतिक सोयाबीन उत्पादन (Soybean Production) यंदा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्यातही ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादनाकडे सोयाबीन बाजाराचे (Soybean Market) लक्ष आहे. तसंच देशात सोयाबीनचे दर स्थिर आहेत.

ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पानाकडे बाजाराचे विशेष लक्ष का आहे? देशात सोयाबीन बाजार कसा राहिला? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. कापूस दरातील सुधारणा कायम

देशातील काही बाजारांमध्ये आज कापसाचे कमाल जर ९ हजार रुपयांपर्यंत पोचले. कर्नाटक आणि गुजरातमधील बाजारांत हा दर मिळाला.

तर देशातील सरासरी दरपातळी आता ८ हजार ४०० ते ९ हजार रुपयांपर्यंत पोचली आहे. बाजारातील आवक स्थिर होती. आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापसाचे दर घटले होते. आज कापसाच्या दरात काहीशी सुधारणा झाली.

मात्र ती मर्यादीत राहिली. देशातील बाजारात कापसाचे दर सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये राहू शकतात, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी, असा जाणकारांचा सल्ला आहे. 

२. तुरीचे दर टिकून

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक कमीच आहे. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. आता कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तूर काढणी सुरु झालीय.

मात्र आवक वाढण्यासाठी अजून वेळ आहे. सध्या बाजारातील सरासरी आवक कमीच आहे. त्यामुळं तुरीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळतोय.

तुरीचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

3. हिरव्या मिरचीला आधार

सध्या बाजारातील हिरव्या मिरचीची आवक काहीशी मर्यादीत झाली आहे. त्यामुळं बाजारात हिरव्या मिरचीला सध्या चांगला दर मिळतोय.

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर आदी मोठ्या बाजारांत आवक काहीशी जास्त दिसत आहे. मात्र इतर बाजारांमधील आवक कमीच आहे.

त्यामुळं मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ३०० रुपये दर मिळतोय. पुढील काही दिवस हे दर कायम राहू शकतात, अशा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

4. कांद्याचे दर दबावातच

देशातील बाजारात सध्या कांद्याची आवक वाढली. त्यामुळं महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये दर नरमलेले आहेत. राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये कांद्याची आवक जास्त आहे.

त्यामुळं कांद्याला सरासरी सरासरी १ हजार २०० ते १ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

मागील एक महिन्यापासून कांद्याचे दर दबावात आले आहेत. मात्र आठवडाभरापासून दरात काहीशी वाढ दिसून आली.

बाजारातील कांदा आवक मर्यादीत झाल्यानंतर कांदा दर सुधारु शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

5. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरु आहेत. हंगामाच्या सुरुवातीला यंदा दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि अर्जेंटीन या देशांमध्ये विक्रमी विक्रमी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र डिसेंबरमध्ये अर्जेंटीनात प्रमुख सोयाबीन उत्पादक भागांमध्ये पाऊस कमी झाला. त्यामुळं अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसंच ब्राझीलमध्येही विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आता मावळलीय.

ब्राझीलमध्येही काही भागांमध्ये पाऊस कमी आहे. त्यामुळं उत्पादन १ हजार ५०० लाख टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे. सोयाबीन उत्पादन आणि निर्यातीत आघाडीवर असलेल्या या दोन्ही देशांमध्ये उत्पादनाचे अंदाज चुकत असल्याचा परिणाम बाजारावर होताना दिसत आहे.

तसंच या दोन्ही देशांमध्ये अंतिम सोयाबीन उत्पानद काय राहते, याकडे सध्या सोयाबीन बाजाराचे लक्ष आहे. तसेच मागील काही दिवसांपासून चीनमधील मार्केट खुले होत आहे. त्यामुळं सोयाबीनला मागणीही वाढली. पण खाद्यतेलाचे दर कमी-जास्त होत आहेत.

त्याचाही परिणाम सोयाबीन दरावर झाला. परिणामी सोयाबीन दरात चढ-उतार दिसत आहेत. तर देशातील बाजारात सोयाबीन एक दरपातळीवर स्थिर आहे.

सध्या देशात सोयाबीनला ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळतोय. मात्र दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि अर्जेंटीनात उत्पादन घटल्यास आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातील बाजारातही दर सुधारतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: खरडून गेलेल्या जमिनीसाठी ९० कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर; शासन निर्णय जारी

Farmers Rights: सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या माथी वरवंटा: राजु शेट्टी

Cold Wave: राज्यात १० दिवस थंडीचा कडाका; पुढील २ दिवस थंडीच्या लाटेचा इशारा

Nagpur Winter Session: कापसाच्या माळा गळ्यात घालून विरोधकांचा विधानभवनावर मोर्चा; शेतकरी प्रश्नावर सरकारला घेराव

Parliament Winter Session 2025: वंदे मातरम् म्हणणाऱ्यांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकले होते, अमित शहांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT