Nashik News: नाशिक जिल्ह्यात यंदा टंचाईवरील उपाययोजनांसाठी सात कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील एक हजार ८४ गाव-वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या गाव-वाड्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी आराखड्यात १६२ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत. .गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने धरणे-तलाव तुडुंब भरली आहेत. तसेच गावपातळीवर साठवणूक तलाव व विहिरींमध्ये आजमितीस मुबलक साठा उपलब्ध आहे. परिणामी टंचाईचा पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात उपाययोजनांची गरज भासली नाही. परंतु, जानेवारी ते मार्च तसेच एप्रिल ते जून अशा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहे. त्यामुळे संभाव्य टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यात टँकरने पाणीपुरवठ्यासोबतच विहिरी अधिग्रहण व प्रगतिपथावरील नळयोजना पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे..Water Scarcity: यंदा पाणीटंचाईची शक्यता कमी.जिल्ह्यात यंदा टंचाईचा पहिला टप्पा निरंक गेला. पण, प्रशासनाने टंचाईच्या अनुषंगाने दुसरा व तिसरा टप्पा मिळून जिल्ह्यात १६२ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत. या टँकरकरिता सहा कोटी ३६ लाख ४८ हजारांचा निधी प्रस्तावित केला आहे..Water Scarcity: देशातील मोठ्या जलाशयांतील पाणीसाठा घसरला; सध्या केवळ ७१ टक्के पाणी उपलब्ध.याव्यतिरिक्त खासगी विहिरी अधिग्रहणासाठी एक कोटी एक लाख ७७ हजार रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण १४ प्रगतिपथावरील नळयोजना पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे..यंदा पाच टँकर अधिकजिल्ह्यात गेल्या वर्षी मार्चपासून जिल्ह्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या; तर मेपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. तरीही काही तालुक्यांत जूनच्या मध्यापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. त्या वेळी टँकरची सर्वोच्च संख्या १५८ च्या आसपास पोहोचली होती. त्या तुलनेत यंदा उन्हाळ्यात अधिकच्या चार ते पाच टँकरची गरज भासू शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.