Sangli Local Body Polls : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराने आता वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वच पक्षांच्या झंझावाती प्रचाराला ब्रेक लागला होता. गेल्या दोन दिवसांपासून प्रचारात रंग भरत आहे..कोल्हापुरात पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांचेच सध्या प्रत्येक तालुक्यात महत्त्व आहे. स्थानिक आघाड्याची चिन्हे वेगळी असल्याने ती मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे. अपवाद वगळता कुठेही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत नाही. सर्व पक्षांनी सोयीच्या आघाड्या केल्याने स्थानिक प्रश्नांवरच रणांगण गाजत आहे. .Local Body Elections: निवडणूक प्रचाराचा हायटेक धुरळा.अनेक ठिकाणी घर टू घर प्रचार केला जात आहे. बहुतांशी उमेदवार नवे असल्याने पहिल्यांदा स्वतःची ओळख करून देऊन मग विकासकामाची चर्चा करण्याचे आव्हान आहे. कधीही सार्वजनिक जीवनात सक्रिय नसलेल्या उमेदवारांना या निवडणुकीत संधी मिळाली आहे. यामुळे थेट घरातून निवडणूक रिंगणात अशी अवस्था बहुतांशी मतदार संघातील उमेदवारांची आहे. निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने यांनी प्रचाराचे दौरे सुरू केले आहेत. .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हातकणंगले तालुक्यात प्रचार सभा घेतल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीचे मतदान दोन दिवसांनी पुढे गेले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत गावागावांतील मनधरणी करून ठेवलेल्या गटा-तटाचा खर्च वाढत असल्याने उमदेवारांच्या नाकीनऊ आले आहे. जेवणावळी, वाहन खर्च, प्रचार, खाणं-पिणं अशा सर्व खर्चात नियोजित रकमेपेक्षा जास्त वाढ होत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे उमेदवारांच्या खर्चाची जबाबदारी आहे. त्यांना हात-आखडता घेण्याची विनंती करावी लागत असल्याचे चित्र प्रत्येक गटात आणि गणात दिसत आहे..Local Body Elections: सातारा जिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायतींत प्रशासकराज .सांगलीत जनताभिमुख मुद्यांची मांडणीसांगली : मिनी मंत्रालयासाठी सध्या जिल्ह्यात प्रचाराने वेग घेतला आहे. विविध नेत्यांच्या सभांतून विकासकामांची आश्वासने दिली जात आहेत. शाळा, दवाखाने, यासह स्थानिक प्रश्नाचा अजेंडा घेऊन गट, गणांतील प्रचार सुरू आहे. मूलभूत सुविधांच्या मुद्द्यांवर मतदारांना आपलेसे करण्याकडे उमेदवारांसह नेत्यांचा कल दिसत आहे. चुरशीच्या गटात मोठी गावकी, भावकीला आपलेसे करण्यासाठी पक्ष व नेत्यांचा जोर दिसत आहे. .प्रचार सभांत नेते थेट एकमेकांवर टोकाचे आरोप टाळून पक्षाच्या नेत्यांनी घेतलेले जनताभिमुख निर्णयांच्या मुक्ष्यांचीच मांडणी सभांमधून होत आहे. जिल्ह्यातील आमदार मतदारसंघांतील गट, गणात जाऊन प्रचार सभा, फेरी, गाठीभेटी, कोपरा बैठका घेण्यावर भर दिला आहे. मतदार संघात प्रचारात सिंचन योजना, शासकीय योजना, पाणंद रस्ते हे मुद्दे आहेत. या निवडणुकीत रील स्टार स्पर्धा लागली आहे..का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सोशल मीडियावरील प्रचारासाठी हजारो ते लाखो रुपये खर्च केले जात आहेत.मात्र या प्रचाराच्या रणधुमाळीत डिजिटल क्रिएटर्ससाठी सुगीचे दिवस आले आहेत. निवडणूक काळात डिजिटल प्रचार आणि मार्केटिंगची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मात्र ही मागणी केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नाही.व्यवसायाचा प्रचार, विविध कार्यक्रमांचे प्रमोशन यासाठीही सोशल मीडियाचा वापर केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.