Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, केळी तसेच काय आहेत तूरीचे दर

Farm Produce Prices : आपण सोयाबीन, कापूस, तूर, टोमॅटो आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा

सोयाबीन बाजारातील मोठ्या पडझडीनंतर बाजार काहीसा सुधारला आहे. कालच्या तुलनेत दरात आज काहीशी वाढ झाली होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचा वायदा ९.६४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. तर सोयातेलाचा बाजार ३९.५३ सेंट प्रतिपाऊंवर होता. सोयापेंडचा भाव ३११ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातील सोयाबीनचे भाव दबावातच असून आजही सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस भावात चढ उतार

कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहते. मात्र देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही वायदे दबावातच आहेत. जागतिक बाजारात यंदा कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. सध्या मात्र कापसाला उठाव कमी आहे. कापसाचे आयसीईवरील वायदे आज दुपारी जवळपास ६९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे काहीसे वाढून ५८ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.


केळीला उठाव

श्रावण महिन्यांतील उपवासामुळे केळीला सध्या चांगला उठाव मिळत आहे. तर बाजारातील केळीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. त्यातच सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण केळीची टंचाई भासत आहे. त्यामुळे केळीचे भाव काहीसे सुधारले आहेत. सध्या केळीला सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. केळीला यापुढे श्रावण, गणपती आणि नवरात्रीत चांगला उठाव राहणार आहे. त्यामुळे केळीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

टोमॅटो बाजार स्थिरावला

बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव आला आहे. जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या सुरुवातीला बाजारात टोमॅटोची आवक कमी होती. मात्र अनेक भागातील तोडा सुरु झाल्यानंतर बाजारातील आवक वाढली. त्यामुळे भाव कमी झाले. गेल्या काही दिवसांपासून भावपातळी स्थिर दिसत आहे. सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार ७०० ते २  हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

तुरीमध्ये काहीशी नरमाई

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT