Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काही सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, गवार यांचे दर काय आहेत?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, गवार आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील काहीशी सुधारणा दिसून आली. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.१७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही भाव आज कायम होते. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव ४ हजार ४५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजारात सोयाबीनची खरेदी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सुरु होती. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूसात काहीशी वाढ

कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. कापसाचे वायदे कालच्या तुलनेत आज काहीसे वाढले होते. अनेक दिवसांनंतर कापसाने आज बाजारात ७० सेंटचा टप्पा पार केला होता. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ७०.५५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील नोव्हेंबरचे वायदे काहीसे कमी होऊन ५७ हजार ५०० हजार रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापूस आवक नगण्य पातळीवर पोचली आहे. तरीही कापसाचे भाव ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गवारला चांगला उठाव

बाजारातील गवारची आवक मागील काही दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे गवारचा भावही टिकून आहे. मागे राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाचा फटक गवार पिकाला बसला आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. गवारचा हा भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्यातील सुधारणा कायम

कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरु झाले. आजही बाजारात काहीशी सुधारणा झाली होती. नाफेडची किरकोळ बाजारात कांदा विक्री सुरु आहे. मात्र नाफेडकडील स्टाॅक जास्त प्रमाणात नाही. त्यामुळे बाजारावर नाफेडच्या विक्रीचा काही प्रमाणात परिणाम होऊन मार्केटमधील तेजी थांबली आहे. सध्या कांद्याला बाजारात सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान होते. कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याचे भाव टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT