Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. शुक्रवारच्या तुलनेत सोयाबीन, सोयापेंडचे भाव काहीसे कमी झाले होते. सोमवारी दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.५४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३४२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ७०० ते ४ हजार ८५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसामध्ये आज सुधारणा

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहिशी सुधारणा झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी दुपारपर्यंत वाढून होऊन वायदे ७३.१२ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील वायदे ५८ हजार २५० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदाच्या भावात नरमाई

कांद्याच्या भावात आज शुक्रवारच्या तुलनेत नरमाई आली होती. देशातील काही भागात नव्या मालाची काही प्रमाणात आवक सुरु झाली. तर अफगाणिस्तानातून कांदा आयातीचीही बाजारात चर्चा आहे. याचा परिणाम कांद्याच्या बाजारावर दिसून आला. कांद्याला आज बाजारात ३ हजार ८०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

डाळिंबाचा भाव टिकून

राज्यातील बाजारात डाळिंबाला चांगला उठाव आहे. मात्र दुसरीकडे बाजारातील डाळिंबाची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे डाळिंबाचा बाजार टिकून आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा जाणवत आहे. गुणवत्तापूर्ण डाळिंबाला बाजारात सध्या चांगला भाव मिळत आहे. राज्यातील बाजारांमध्ये डाळिंबाला सध्या सरासरी ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुणवत्तापूर्ण मालाचा भाव १० हजारांपेक्षाही जास्त असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. डाळिंबाचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याचे बाजार टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

Illegal Tap Connection : बेकायदा नळजोडणीचे कनेक्शन घट्ट

SCROLL FOR NEXT