Agriculture Market
Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापसात नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा, टोमॅटोचे दर काय ?

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या भावातील नरमाई कायम आहे. कापसाचे भाव बाजार समित्या वायद्यांमध्येही नरमले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे ८० सेंट प्रतिपाऊंडपेक्षाही कमी झालेले आहेत. तर देशातील वायदे ५७ हजार १८० रुपयांनी कमी झाले.

बाजार समित्यांमध्येही भावही काही दिवसांपासून कमी झाले. सध्या बाजारसमित्यांमध्ये कापूस ७ हजार ३०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसातील चढ उतार आणखी काही दिवस राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनच्या बाजारातील चढ उतार कायम आहेत. सोयाबीनचा भाव गेल्या काही दिवसांपासून एका मर्यादेत कमी जास्त होत आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे भावही ४ हजार ७५० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे.

त्याचाही फायदा सोयाबीन भावाला मिळत आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात मक्याचे भाव टिकून आहेत. देशात यंदा मक्याचे उत्पादन घटले. तसेच इथेनाॅलसाठी मागणी चांगली आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे. तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे.

त्यातच बाजारातील मका आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे. कांद्याची बाजारातील आवक कमी असूनही बाजारभाव वाढताना दिसत नाहीत. सरकारची निर्यातबंदी आणि सरकारच्या इतर धोरणांचा दबाव कांद्यावर कायम आहे.

त्यामुळे सध्या कांदा भाव १००० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातील कांदा उत्पादनही यंदा घटले आहे. पण कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे. टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी झालेला दिसून येत आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे.

तर सरासरी भावपातळी  एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

Market Price Kolhapur : कोथिंबिरीची पेंढी ४० रुपयांना, लोणच्याच्या आंब्यांना मागणी

Rural Development : पंचायत राज रचनेतून ग्राम विकासाला चालना

Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

SCROLL FOR NEXT