Soybean Market : सोयाबीन दबावातच; तूर १२ हजारांच्या पार

Tur Market : सोयाबीनचे दर हंगामभर दबावात असतानाच तुरीच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत आहे. सध्या तुरीला १२ हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : सोयाबीनचे दर हंगामभर दबावात असतानाच तुरीच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत आहे. सध्या तुरीला १२ हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे. परंतु सोयाबीनला पाच हजार रुपयांचाही पल्ला गाठता आलेला नाही. सोयाबीनचे व्यवहार ४१५१ ते ४६५० रुपयांनी होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

नागपूरच्या कळमना (Kalamna) बाजार समितीत शेतीमालासह देशभरातील फळांची आवक होते. सध्या सोयाबीनचा विचार करता याची आवक सरासरी ८०० क्‍विंटल आहे. सोयाबीनचे व्यवहार गेल्या आठवड्यात ४२०० ते ४६४२ रुपयांनी होत होते.

Soybean Market
Tur Market : देशभरात तुरीच्या भावाची चढती कमान

आता सोयाबीनची आवक २९० क्‍विंटलपर्यंत खाली आले आहेत. दर ४१५० ते ४६५० रुपयांवर आले आहेत. यंदाच्या हंगामात सोयाबीन पाच हजार रुपयाचा पल्ला गाठेल, अशी अपेक्षा होती. मात्र हंगाम संपूनही सोयाबीनचे दर पाच हजारांवर पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) अस्वस्थता आहे.

तुरीची आवक आणि दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात तूर आवक ३३६४ क्विंटल आणि दर ९५०० ते १२००० रुपये होते. या आठवड्यात आवक ८७४ क्‍विंटल आणि दर ९९०० ते १२१०२ रुपयांवर पोचले. बाजारात तांदळाला ३५०० ते ३८०० रुपयांचा दर मिळत असून आवक २० क्‍विंटल इतकी अत्यल्प झाली.

Soybean Market
Soybean Market : परभणीत सोयाबीनला मिळतोय कमाल ४७५० रुपयांचा दर

संत्र्यास ४ ते ५ हजार रुपये दर

बाजारात टरबूज आवक १००० क्‍विंटलवरुन आता अवघ्या ५०० क्‍विंटलवर आली आहे. सुरवातीला टरबूज दर १५०० ते २५०० रुपयांवर होते. आता ते ८०० ते १००० रुपयांवर आहेत. टोमॅटोचे व्यवहार गेल्या आठवड्यात १३०० ते १७०० रुपयांनी होत होते.

सध्या त्याची आवक ५०० क्‍विंटलची तर दर १००० ते १५०० रुपये आहेत. वांग्यांचे या आठवड्यात ८०० ते १००० रुपयांनी व्यवहार झाले. लाल मिरचीचे दर ४००० ते १४ हजार रुपयांवर स्थिर आहेत. पालकाला ५०० ते ८०० रुपयांचा दर आहे. चांगल्या प्रतीच्या संत्रा फळांना ४००० ते ५००० रुपयांचा दर मिळत असून आवक अवघी २० क्‍विंटल आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com