Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीमध्ये काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, कांदा आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे शुक्रवारी काही प्रमाणात कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७२.३१ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५७ हजार ७६० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी काही ठिकाणी आज काहीशी नरमली होती. पण सरासरी भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांवर होती. कापूस बाजारतील चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. सोयाबीनचे वायदे ११.६० डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे ३६२ डाॅलरवर होते. देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते. सोयाबीनचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावातील सुधारणा कायम आहे. बाजारातील कांद्याची कमी झालेली आवक आणि चांगला उठव, यामुळे कांद्याटचे भाव सुधारल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या कांद्याचा सरासरी भाव २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे. तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशाने थांबले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याच्या भावातही काही प्रमाणात चढ उतार दिसून येत आहेत. मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे. पण दुसरीकडे मागणी चांगली आहे. बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला. सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT