Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीच्या भावात काहीशी वाढ; कापूस, सोयाबीन, मोसंबी, कांद्याचे काय आहेत दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मोसंबी, तूर आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा दिसून आली. सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत १०.२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारात मा्त्र आजही सोयाबीनचा भाव स्थिर होता. सोयाबीनला आज ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव आजही ४६०० ते ४७७५ रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसात काहीशी नरमाई

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाच्या वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत ७० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५९ हजार १२० रुपये प्रतिखंडी होते. बाजार समित्यांमध्ये मात्र भाव स्थिर आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मोसंबीचे भाव नरमले

मोसंबीचा नवा हंगाम आता सुरु झाला. बाजारात नव्या मोसंबीचा माल सुरु झाला आहे. पण नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यातील मोसंबी पट्ट्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मोसंबी पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. गुणवत्ताही खालवली. यामुळे मोसंबीच्या भावावर दबाव आला. सध्या मोसंबीला ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मोसंबीची आवक पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने नुकसान झाल्याने गुवत्तापूर्ण मोसंबीला चांगले मार्केट राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

कांदा स्थिरावला

नाफेडने बाजारात कांद्याची विक्री सुरु केल्यानंतर कांद्याच्या भावात नरमाई आली आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून कांद्याचा भाव स्थिरावला आहे. परंतु आजही उच्चांकी भावापेक्षा मार्केट रेट ४०० ते ६०० रुपयांनी कमी आहे. आजही कांदा मार्केट ३ हजार ४०० ते ३ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. नाफेडने बाजारात कांदा विक्री सुरु केली तरी बाजारावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. कांदा भावात पुढच्या काळात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीचा भाव स्थिरावला

तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता. तसेच आयातही सुरु आहे. याचा दबाव दरावर आला. पण भाव १० हजारांच्या दरम्यान राहीले होते. मात्र सणांची मागणी वाढल्याने तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. तुरीचा सरासरी भाव १० हजार ते १० हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT