Agriculture Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: बटाट्याचा बाजार टिकून; कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची तसेच काय आहेत कापूस भाव?

Daily Commodity Rates: आज आपण कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, बटाटा आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

कांदा भाव दबावातच

बाजारातील कांद्याची आवक चांगली सुरु आहे. काही बाजारांमध्ये अवकाळी पावसामुळे आवकेवर परिणाम दिसत आहे. मात्र पुढे कांद्याला उठाव सरासरीच आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत. कांद्याला सरासरी बाजारात सरासरी ९०० ते ११०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. बाजारातील कांद्याची आवक मे महिन्यात काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटो दर मंदीतच

टोमॅटोचा भाव दबावातच आहे. बाजारातील टोमॅटोची आवक सुरळीत सुरु आहे. आवकेचा दबाव बाजारावर दिसून येत आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे. तर पुढे टोमॅटोचा उठाव स्थिर आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहेय. राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते ११०० रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावरही दबाव दिसू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ढोबळी मिरची स्थिर

बाजारात ढोबळी मिरचीची आवक स्थिरावलेली दिसत आहे. तर ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे. त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ढोबळ्या मिरचीची आवक पुढील काळातही कमी राहणार आहे. मे महिन्यानंतर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर बाजारातील मागणी कायम राहू शकते. त्यामुळे दरालाही आधार मिळेल, असे व्यापारी सांगत आहेत.

बटाटा दर टिकून

देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढले आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यांतील उत्पादन वाढले आहे. मात्र बाजारातील बटाट्याचा पुरवठा मागील काही आठवड्यांपासून काहीसा स्थिरावला. बटाट्याला पुढे मागणीही चांगली आहे. त्यामुळे दरही स्थिरावले आहेत. सध्या बाजारात बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील बटाट्याची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र लग्नसराईमुळे बटाट्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बटाटा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दरात चढ उतार

कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरु झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी असलेले भाव आणि देशातील तुलनेत अधिक भाव यामुळे दरवाढीवर मर्यादा येत आहेत. कापसाची आयातही वाढलेली आहे. देशात सीसीआय देखील कापसाची विक्री करत आहे. त्यामुळे कापूस दरातील तेजी विरली आहे. कापसाचा भाव मागील काही आठवड्यांपासून ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. यापुढील काळातही कापूस बाजारात हेच घटक दरावर प्रभाव टाकतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT