
Akola News : वाशीम जिल्हयात शेतीमध्ये प्रयोगशीलता वाढत आहे. रिसोड तालुक्यातील लोणी येथील स्वप्निल विजय गाडे या तरुण पदवीधर शेतकऱ्याने यंदा खरिपात एक एकरात बटाट्याची लागवड करीत चांगले उत्पादन मिळवले आहे.
हा भाग खरिपात केवळ सोयाबीन पिकावर अवलंबून असून अशा भागात स्वप्निलने नवीन प्रयोग केला. बटाट्याला जागेवरच २२ रुपये प्रतिकिलोचा दरही मिळाल्याने हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे.
गाडे कुटुंबाकडे ३२ एकर शेती आहे. स्वप्निल एमएसस्सी बीएड झालेला असून दीड वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीत उतरला आहे. त्यांच्याकडे आधी पारंपरिक पीक पद्धतीने सोयाबीन आणि तूर हीच खरिपाची पिके होती. तर रब्बीत गहू, हरभरा या भागात घेतल्या जातो. हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे.
काही माती लालसर सुद्धा आहे. त्यांच्याकडे भारी जमिनीचे क्षेत्र फक्त दीड ते दोन एकर एवढेच आहे. अशा आव्हानात्मक भागात स्वप्निलने यंदा सोयाबीनऐवजी काही क्षेत्रात बटाटा लागवड करण्याचे ठरवले. पाठीशी वडील व त्यांचे मार्गदर्शन नसल्याने नवीन काही करायला मनात भीतीसुद्धा वाटत होती.
म्हणून एक एकरावरच बटाटा लागवड करण्याचा प्रयोग केला. या भागात पहिल्यांदाच बटाट्याची लागवड या गाडे कुटुंबाने केली. ठिबकचा वापर केला. बटाट्यावर मुख्यतः लाल कोळी आणि करपा येतो.
सुरुवातीपासूनच योग्य काळजी घेतल्याने हे दोन्ही प्रकार नियंत्रणात राहिले. एक एकरासाठी बियाणे व इतर खर्च मिळून ४० हजारांपर्यंत संपूर्ण खर्च लागला होता. या क्षेत्रात ११० क्विंटल उत्पादन झाले. जागेवरच बटाट्याला २२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याचे स्वप्निल गाडे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.