Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: कांदा दरात चढ उतार; मका, मूग, कापूस तसेच काय आहेत सोयाबीन भाव?

Daily Commodity Rates: आज आपण सोयाबीन, कापूस, मूग, मका आणि कांदा बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

सोयाबीनमध्ये नरमाई

सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु झाले आहेत. आज कालच्या तुलनेत सोयाबीनच्या भावात क्विंटलमागे २० ते ३० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. तर बाजारातील सोयाबीनची आवक मर्यादीतच होत आहे. त्यामुळे सोयाबीनचा बाजार आजही ३ हजार ८०० ते ४ हजारांच्या दरम्यान होता.

तर प्रक्रिया प्लांट्सनीही खरेदीचे भाव आज २० ते ३० रुपयांनी वाढवले होते. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनची खरेदी ४ हजार ३०० ते ४ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान केली. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाचे भाव स्थिर

कापसाचा बाजार मागील आठवडाभरापासून स्थिरावला आहे. तर दुसरीकडे बाजारातील कापसाची आवकही कमी होताना दिसत आहे. मागील आठवड्यापर्यंत बाजारात सव्वा लाख गाठींच्या दरम्यान सोयाबीनची आवक होती.

मात्र आता बाजारात रोज एक लाख गाठींच्या दरम्यान आवक दिसत आहे. तर दरपातळी बाजारभाव ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक यापुढच्या काळात कमी होत जाईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मुगाचा बाजार दबावात

देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे.

देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याला आधार

मक्याला यंदाही इथेनाॅलसाठी चांगली मागणी आहे. त्यामुळे मका बाजाराला आधारही मिळत आहे. मात्र रब्बी हंगामातही मक्याची वाढलेली लागवड आणि खरिपातील चांगल्या उत्पादनाचा अंदाज आहे. त्यातच मक्याचा स्टाॅक देशात चांगला उपलब्ध आहे. त्यामुळे मक्याचा बाजारात काहीसा स्थिरावलेला आहे.

मक्याचा सरासरी भाव अनेक बाजारात आता २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. रब्बीतील पिकाची आवक बाजारांमध्ये होत आहे. बाजारात आवकेचा दबाव असेपर्यंत दरपातळी काहीशी स्थिर दिसू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्यात काहीसे चढ उतार

कांद्याच्या भावात मागील काही दिवसांमध्ये काहीसे चढ उतार सुरु आहेत. बाजारातील मर्यादीत आवक आणि चांगला उठाव याचा दराला आधार मिळत आहे. आज बाजारात कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला.

बाजारातील कांदा आवक पुढील दोन आठवड्यांनंतर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. त्यावेळी बाजारात खरिपातील आणि रब्बीतील कांदा बाजारात येऊ शकतो. उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : ट्रॅक्टरची विक्रीने सलग तीन महिन्यात ओलांडला एक लाखांचा टप्पा; मॉन्सून आणि खतांच्या टंचाईचा होणार परिणाम?

Cotton Crop Management: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर कापूस व्यवस्थापन

Congress Protest: शेतकरी प्रश्नी काँग्रेस आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्तारोको, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Global Food Security: जागतिक अन्नसुरक्षेला धक्का बसणार?

Dairy Farming Success Story: दूध व्यवसायाला दिली मूल्यवर्धनाची जोड

SCROLL FOR NEXT