Market Bulletin :
सोयाबीनमध्ये नरमाई
आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही आज सोयाबीनमध्ये नरमाई दिसून आली. सोयापेंडही काहिसे कमी झाले होते. सोयाबीनचे वायदे आज दुुुपारपर्यंत ९.९१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड २८६ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ३७५ ते ४ हजार ४७० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.
कापसात चढ उतार
कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६७.६३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये काहिसे चढ उतार सुरु आहेत. जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला ५६ हजार ६० रुपये भाव मिळाला. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कमी झाले आहेत. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांदा दरात सुधारणा
राज्यातील बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. सध्या कांद्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला. सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तर खरिप कांद्याची बाजारातील आवक काहिशी लांबली आहे. त्यामुळे कांद्याची उपलब्धता कमी आहे. खरिपातील कांद्याची आवक वाढण्याला आणखी काही आठवडे लागतील. परिणामी कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत.
तिळाचे भाव स्थिर
तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
गव्हाचे भाव तेजीतच
देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. गव्हाला सध्या सणांची मागणी आहे. गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते. तसेच सरकारडे गव्हाचा स्टाॅक कमी आहे. बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे. त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर आहेत. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. ऐन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.