Agrowon Podcast : हरभरा दरात नरमाई; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत केळीचे दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, केळी आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये सुधाऱणा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत तर सोयापेंडच्या भावात नरमाई दिसून आली. सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये १०.०३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव कमी होऊन वायदे २९९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसाचे भाव स्थिर

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६९.७५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज काहीसे कमी झाले होते. देशातील वायद्यांमध्ये कापूस कमी होऊन ५५ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होता. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Maize Rate : मलकापुरात मक्याचा किमान दर १३८० पर्यंत घसरला

हरभरा दरात नरमाई

देशातील बाजारात हरभरा दरात नरमाई दिसून आली. हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झाले, असे व्यापारी सांगत आहेत. हरभरा भावावर पिवळा वाटाणा आयातीचा परिणाम होत आहे. पिवळा वाटाणा स्वस्त असल्याने हरभरा भावही कमी होण्याला मदत झाली. देशातील बाजारात हरभरा भाव सध्या ६ हजार २०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

Market Update
Pomegranate Rate : हंगामाच्या प्रारंभीच डाळिंबाचे दर दबावात

केळीचे दर टिकून

राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे. पुढे सणासुदीचा कालावधी आहे. यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे. नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर, जानेवारीत सुरू होईल. तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तिळाचे भाव स्थिर

तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com