Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : गव्हाचे बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत केळीचे दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, गहू, हरभरा आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये ९.८६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव कमी होऊन वायदे २९५ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसाचे भाव नरमले

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६९.७३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज काहीसे कमी झाले होते. देशातील वायद्यांमध्ये कापूस काहिसा वाढून ५५ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होता. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाचे भाव टिकून

देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. गव्हाला सध्या सणांची मागणी आहे. गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते. तसेच सरकारडे गव्हाचा स्टाॅक कमी आहे. बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे. त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर आहेत. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. ऐन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

हरभरा दरात नरमाई

देशातील बाजारात हरभरा दरात नरमाई दिसून आली. हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झाले, असे व्यापारी सांगत आहेत. हरभरा भावावर पिवळा वाटाणा आयातीचा परिणाम होत आहे. पिवळा वाटाणा स्वस्त असल्याने हरभरा भावही कमी होण्याला मदत झाली. देशातील बाजारात हरभरा भाव सध्या ६ हजार २०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

केळीचे दर टिकून

राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे. पुढे सणासुदीचा कालावधी आहे. यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे. नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर, जानेवारीत सुरू होईल. तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Vidhansabha Election : अहिल्यानगर जिल्ह्यात बंडखोरीने पक्षीय उमेदवारांचे वाढवले ‘टेन्शन’

Cotton Market : दर्यापूर बाजार समिती यार्डवर होणार कापूस लिलाव

Paddy MSP : भातपिकाला हमीभावाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Livestock Census Survey : जळगावात पशुगणना सर्व्हेक्षण सुरू

Karnataka Sugar Factories : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने सुरू; कोल्हापूर विभागातील उसाची होणार पळवापळवी

SCROLL FOR NEXT