Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: काबुली हरभरा तेजीत; डाळिंब, गवार, लसूण तसेच काय आहेत आजचे लिंबू दर?

Daily Commodity Rates: आज आपण काबुली हरभरा, डाळिंब, गवार, लसूण आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

काबुली हरभरा तेजीत

काबुली हरभऱ्याचे दर तेजीतच आहेत. देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन कमी राहीले. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर मागील काही आठवड्यांपासून तेजीत आले आहेत. बजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे काबुली हरभऱ्याचे भावही टिकून आहेत. एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. यापुढील काळात बाजारातील काबुली हरभऱ्याची आवक कमी होत जाईल. मात्र काबुली हरभऱ्याला उठाव चांगला राहील. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

डाळींबाचा बाजार टिकून

डाळींबाचा उठाव कायम आहे. डाळिंबाची बाजारातील आवक कमीच आहे. पावसामुळे काही दिवस डाळिंबाची आवक वाढलेली दिसली. मात्र पिकाला फटकाही बसला. परिणामी पुढील काळात बाजारातील डाळिंबाची आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. सध्या राज्यातील बाजारात डाळिंबाला गुणवत्तेप्रमाणे ६ हजार ते ९ हजारांचा दर मिळत आहे. डाळिंबाची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरही आणखी काही आठवडे टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

गवारला चांगला उठाव

गवारचे भाव मागील २ आठवड्यात चांगलेच वाढले आहेत. गवारची बाजारातील आवक पावसामुळे कमी झाली आहे. गवार पिकासाठी एप्रिल आणि मे महिन्यात पोषक हवामान राहीले नाही. त्याचा फटका पिकाला आधीपासूनच बसत होता. मे महिन्यातील पावसाने पिकाचे नुकसान वाढले. त्यामुळे आवक कमी होऊन भाव तेजीत आले. गवारचे भाव बहुतांशी बाजारात सरासरी ६ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचले आहेत. गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचे भावही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

लसणाचे दर स्थिर

बाजारात लसणाची आवक चांगली सुरु आहे. मालातील ओलावा देखील कमी होताना दिसत आहे. पुढे लसणाला मागणीही वाढलेली आहे. लग्न आणि समारंभामुळे लसणाचा उठाव कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील लसणाची आवक कमी होत जाईल, असे व्यापारी सांगत आहेत. सध्या लसणाला प्रतिक्विंटल ६ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. लसूण बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काही दिवस दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

लिंबाची आवक घटली

पावसामुळे लिंबाची फळगळ झाल्याने काही दिवस लिंबाची आवक वाढली होती. त्यामुळे दरावरही दबाव आला होता. मात्र पावसाचे वातावरण निवळल्याने लिंबाला पुन्हा उठाव मिळत आहे. तर बाजारातील लिंबाची आवकही कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. दुसरीकडे बागांमध्ये चांगला माल कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा आधार लिंबु दराला मिळत आहे. आज लिंबाला बाजारात सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही दिवस वादळी पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. या काळात लिंबाच्या भावातही काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज लिंबू व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Daughter Wedding Story: उद्या मुलीचं लग्न आहे, कुणीतरी माझा शेतीमाल खरेदी करा

Irrigation Subsidy: ठिबक, तुषार योजनांच्या अनुदान प्रक्रियेतील त्रुटी दूर करा

Dry Fruit Price: नागपुरात सुकामेवा महागला

Grape Export Loss: द्राक्ष निर्यातीला २५ कोटींचा फटका

Watermelon Price: खानदेशात कलिंगड दर घसरले

SCROLL FOR NEXT